इंडियन प्रीमियर लीग, हा असा मंच आहे जिथे प्रतिभाशाली क्रिकेटपटूंना त्यांची चमक दाखवण्याची संधी मिळते. त्यातही आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स, हे २ संघ नव्याने सहभागी झाल्याने बऱ्याच नवख्या खेळाडूंसाठी जागा उपलब्ध झाल्या आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (DC vs KKR) यांच्यात गुरुवारी (२८ एप्रिल) आयपीएल २०२२चा ४१वा सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यातून कोलकाताकडून हर्षित राणा आणि बाबा इंद्रजित (Baba Indrajith) यांनी आयपीएलमध्ये पदार्पण (KKR Debutant) केले. यातीलच इंद्रजितच्या प्रवासावर आपण एक नजर टाकणार आहोत.
बाबा इंद्रजितने दिल्लीविरुद्ध आयपीएल पदार्पण केले. परंतु पदार्पणाच्या सामन्यात त्याला विशेष प्रदर्शन करता आले नाही. तो या सामन्यात केवळ ६ धावा करून बाद झाला.
बाबा इंद्रजित (Special Story About Baba Indrajith) हे नाव आयपीएलमप्रेमींमध्ये नवे आहे. परंतु देशांतर्गत क्रिकेटमध्ये या या २७ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाजाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा जन्म ८ जुलै १९९४ रोजी तमिळनाडूच्या चेन्नईत झाला होता. तो कमालीचा अष्टपैलू क्रिकेटपटू असून फलंदाजी, गोलंदाजीबरोबरच यष्टीरक्षणातही माहीर आहे. त्याने ९ वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१३ मध्ये सौराष्ट्रविरुद्ध आपल्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या प्रदर्शनाचा ठसा उमटवला.
"𝘊𝘩𝘢𝘭𝘭𝘦𝘯𝘨𝘪𝘯𝘨 𝘵𝘩𝘦 𝘤𝘩𝘢𝘭𝘭𝘦𝘯𝘨𝘦 𝘪𝘴 𝘸𝘩𝘢𝘵 𝘪𝘵 𝘮𝘦𝘢𝘯𝘴 𝘵𝘰 𝘣𝘦 𝘢 𝘒𝘯𝘪𝘨𝘩𝘵!" 💜💛
Go well, @IndrajithBaba! 💪#KnightsTV presented by @glancescreen | #KKRHaiTaiyaar #DCvKKR #IPL2022 pic.twitter.com/UNSMhYHDaL
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 28, 2022
बाबा इंद्रजितने रणजी ट्रॉफी २०२१-२२ मध्ये आपल्या राज्यासाठी सर्वाधिक धावा बनवल्या. त्याने या हंगामात ९९ च्या सरासरीने फलंदाजी करताना ३९६ धावा फटकावल्या होत्या. या हंगामात त्याच्या बॅटमधून ३ शतके निघाली होती. तत्पूर्वी रणजी ट्रॉफी २०१८-१९मध्ये त्याने तमिळनाडूकडून सर्वाधिक धावा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याने ६४१ धावा केल्या होत्या.
त्याच्या देशांतर्गत क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने ५६ प्रथम श्रेणी सामने खेळताना ५३.३५ च्या सरासरीने ३७८८ धावा केल्या आहेत. तसेच ४१ अ दर्जाचे सामने खेळताना त्याने ११५४ धावा आणि २१ टी२० सामने खेळताना ३२५ धावा केल्या आहेत.
बाबा इंद्रजितचा जुळा भाऊही आहे क्रिकेटपटू
बाबा इंद्रजितचा एक जुळा भाऊ आहे, ज्याचे नाव बाबा अपाराजित आहे. तोही एक शानदार अष्टपैलू आहे आणि तमिळनाडू संघासाठी खेळतो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बाबा इंद्रजित बाबा अपराजितचा वरिष्ठ क्रिकेटपटू आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
उमरान मलिकने हार्दिक पंड्याच्या पत्नीची हात जोडून मागितली क्षमा, पण का? घ्या जाणून
धोनीचा शिष्य शोभतोय! पंतने अवघड कॅच घेत कोलकाताच्या कर्णधाराला धाडले तंबूत; त्यालाही बसेना विश्वास
पहिल्याच षटकात फिंचला क्लिन बोल्ड केल्यानंतर सकारियाचे ‘गोकू स्टाईल’ सेलिब्रेशन