गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील ४०वा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात हैदराबाद संघाने जबरदस्त प्रदर्शन केले. परंतु अखेर गुजरातने ५ विकेट्स राखून हा सामना जिंकला. या सामन्यात हैदराबादकडून शशांक सिंग याने धडाकेबाज खेळ दाखवला. या ३० वर्षीय भारतीय क्रिकेटपटूने हैदराबादकडून खालच्या फळीत झटपट खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले.
शशांकला (Shashank Singh) हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) शेवटची ३ षटके खेळण्याची संधी मिळाली. यात महत्त्वपूर्ण विसाव्या षटकाचाही समावेश होता. त्याने लॉकी फर्ग्युसनच्या (Lockie Ferguson) तेज तर्रार गोलंदाजीवर अखेरच्या षटकात धुव्वादार फटकेबाजी करत संघाची धावसंख्या १९५ पर्यंत पोहोचवली.
सलामीवीर अभिषेक शर्माची ६५ धावांची शानदार खेळी व ऍडन मार्करमच्या ५६ धावांच्या खेळीनंतर शशांकने डावाअंती झटपट धावा जोडल्या. त्याने ६ चेंडू खेळताना ४१६ च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी करत २५ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार आणि १ चौकार मारले.
Check out M40: GT vs SRH – Shashank Singh Six on IPL 2021: https://t.co/XOzCUtjAZf
— jasmeet (@jasmeet047) April 27, 2022
शशांक क्लिन स्ट्राईकर असण्याबरोबरच ऑफ ब्रेक गोलंदाजही आहे. अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्याने काही अविस्मरणीय खेळीही केल्या आहेत. त्याला यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले होते. २०१९ मध्ये तो राजस्थान रॉयल्सशी जोडला गेला होता. परंतु हैदराबादने ९ एप्रिल २०२२ रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देत आयपीएलच्या रणांगणात आपली प्रतिभा दाखवण्याची संधी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा आपल्या सहाव्या आयपीएल सामन्यात अप्रतिम खेळी करत तो सर्वांच्या नजरेत आला आहे.
शशांकने (Shashank Singh Special Story) अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाही, परंतु त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काही प्रशंसनीय खेळी केल्या आहेत. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ३८ टी२० सामने खेळताना ४४९ धावा केल्या आहेत. तसेच २३ अ दर्जाचे सामने खेळताना ५३६ धावा केल्या आहेत. याखेरीज ९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याच्या नावे ४३६ धावा आहेत, ज्यामध्ये एका शतकाचाही समावेश आहे.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १९५ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरातने ५ विकेट्स गमावत हैदराबादचे लक्ष्य गाठले आणि सामना खिशात घातला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! इंग्लंडला मिळाला रुटचा वारसदार; बेन स्टोक्स बनला नवा कसोटी कर्णधार
दिल्लीचा सामना पाहून चिडलेला पाँटिंग, ३-४ रिमोटही तोडले होते, स्वत:च केलाय खुलासा
‘ईश्वर म्हणतोय, मी तुम्हाला मदत करतो,’ हार्दिकची हैदराबादविरुद्धच्या रोमांचक विजयानंतर प्रतिक्रिया