---Advertisement---

दिग्गज गोलंदाज कोण? इंग्लंडच्या माजी कर्णधारानं दिली प्रतिक्रिया

England-Team
---Advertisement---

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वाॅनला (Michael Vaughan) वाटत आहे की, सपाट खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाज मार्क वूड (Mark Wood) हा बेन स्टोक्सपेक्षा (Ben stokes) महत्त्वाचा खेळाडू ठरतो. श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये वुडची अनुपस्थिती हा मोठा धक्का असल्याचंही मायकल वाॅननं म्हटलं आहे. ओल्ड ट्रॅफर्ड येथे मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यात वुडला उजव्या हाताला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो उर्वरित सामन्यांतून बाहेर पडला. इंग्लंडनं शनिवारी (24 ऑगस्ट) रोजी श्रीलंकेविरुद्धचा कसोटी सामना 5 गडी राखून जिंकला.

मायकल वाॅन म्हणाला की, “जेव्हा तुम्ही सपाट खेळपट्टीवर उतरता तेव्हा मार्क वुड (Mark Wood) हा इंग्लंडच्या कसोटी संघासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. होय, बेन स्टोक्सपेक्षाही अधिक वुड खूप चांगला आहे आणि दुखापतीमुळे त्याला श्रीलंकेविरुद्धच्या उर्वरित मालिकेतून बाहेर काढणे हा एक धक्का आहे.”

पुढे बोलताना मायकल वाॅन म्हणाला की, “स्टोक्स एक महान खेळाडू आहे. एक अविश्वसनीय कर्णधार, एक विलक्षण खेळाडू. पण इंग्लंड वुडच्या जागी कोणत्याही खेळाडूला कसे घेऊन येईल हे मला समजत नाही.”

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानच्या संघात मोठा फेरबदल, टी20 विश्वचषकासाठी ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर नेतृ्त्वाची जबाबदारी
2024च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला केलं मुद्दाम ट्रोल, मोठं कारण उघडकीस
पाकिस्तानला हरवल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---