सध्या सर्वत्र टोकियो ऑलिम्पिकचे वारे वाहत आहेत. या ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वच खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या देशाला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. याच टॉकियो ऑलम्पिक स्पर्धेत एक असा चेहरा दिसून आला आहे, जिला पाहून सर्वच चाहत्यांची झोप उडाली आहे. तो चेहरा म्हणजे रिद्धिमा पाठक हिचा. रिद्धिमा पाठक ही सध्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये समालोचन करत आहे.
रिद्धिमा पाठक ही पेशाने एक अँकर, मॉडेल, व्हॉईस आर्टिस्ट त्याचबरोबर टीव्ही प्रस्तुतकर्ता देखील आहे. तिने ‘रेडिओ मिर्ची पुणे’मधून इंटर्नशिप केली आहे आणि तिथे ती व्हॉईस ओवर द्यायला शिकली आहे.
रांचीची आहे रिद्धिमा
रिद्धिमा पाठक हिचा जन्म १७ फेब्रुवारी १९९० रोजी झाला असून ही मूळची झारखंडची राजधानी रांची येथील रहिवासी आहे. रिद्धिमा पाठकने तिचे शालेय शिक्षण मुंबई, शिमला आणि चेन्नई येथून झाले आहे. त्याच बरोबर तिने पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
रिद्धिमा पाठकच्या परिवारात चार जण आहेत. तिच्या वडिलांचे नाव मिथिलेश के पाठक आहे आणि आईचे नाव कामिनी पाठक आहे. त्याचबरोबर रिद्धिमाच्या भावाचे नाव ईशान पाठक आहे.
क्रिकेट विश्वचषकादरम्यान आली चर्चेत
रिद्धिमाने सोनी सिक्स, टेन स्पोर्ट्स, झी स्टुडिओ त्याचबरोबर स्टार स्पोर्ट्स चॅनेलसाठी काम केले आहे. तिने २०१९ च्या आयसीसी विश्वचषकात डिजिटल प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे. या दरम्यान रिद्धिमा मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती. रिद्धिमा एक समलोचक असल्याने तिने विराट कोहली आणि एमएस धोनीसारख्या स्टार क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेतलेल्या आहेत.
रिद्धिमाने ऑलिम्पिकवर वर्चस्व गाजवले
रिद्धिमा पाठक सध्या टोकियो ऑलिम्पिकसाठी समालोचन करत आहे. त्याचबरोबर तिने आपल्या सादरीकरणाने चाहत्यांचे भरपूर प्रेम मिळवले आहे आणि चाहत्यांना तिचे सादरीकरण देखील खूप आवडते.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलपूर्वी न्यूझीलंडचा संघ करणार बांगलादेश दौरा, असे आहे पूर्ण वेळापत्रक
थोडीशी मजामस्ती! जेव्हा पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये झाली ख्रिस गेलची एन्ट्री, रंगला हास्यकल्लोळ