रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार म्हणून नेहमीच शानदार कामगिरी केली आहे. त्याने कसोटी वनडे आणि टी20 इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये कमालीचं प्रदर्शन केल आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सुद्धा चांगलं खेळामध्ये प्रदर्शन केलं आहे. भारतीय संघ रोहितच्या नेतृत्वाखाली आयसीसीच्या 4 स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. पण आता रोहितच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. एका रिपोर्ट्स नुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (champions trophy 2025) स्पर्धेनंतर भारतीय संघ यामध्ये मोठा बदल करू शकते.
भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी20 विश्व कप 2024 किताब जिंकला होता. तसेच वनडे विश्व कप 2023 च्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. तसेच आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सुद्धा पोहोचली आहे. इथे त्यांचा सामना न्यूझीलंड संघाशी होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना रविवार 9 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रोहितसाठी कर्णधार म्हणून शेवटचा ठरू शकतो. या संबंधित अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर विश्व कप तयारीला लागेल. रोहित ने टी20 इंटरनॅशनल मधून निवृत्ती घेतली आहे. पण वनडे आणि कसोटी सामने तो अजूनही खेळू शकतो. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर रोहितच्या कर्णधार पदाबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. यासंबंधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीर आणि क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांच्यामध्ये मीटिंग घेण्यात आली होती. पण या संबंधित अजून कोणतीही माहिती मिळाली नाही.
बोर्ड सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (Board control contract) संबंधित मोठी अपडेट समोर येऊ शकते. रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या अ प्लस कॅटेगरीमध्ये आहेत. तसेच अक्षर पटेल, के एल राहुल आणि रिषभ पंत यांना क्रिकेट बोर्ड प्रमोट करू शकतो. याचबरोबर श्रेयस अय्यरचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मध्ये पुनरागमन होऊ शकते.
हेही वाचा
केवळ नावाचा ‘हिटमॅन’? आयसीसी फायनलमधील आकडेवारी पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
IND vs NZ: अंतिम सामन्यात टीम इंडियाचा हर्टब्रेक होणार, हे 3 किवी स्टार्स देणार डोकेदुखी
केएल राहुल अंतिम सामन्यातून बाहेर, प्रशिक्षक गंभीर कोणाला देणार संघात स्थान?