भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) २ दिवसांपूर्वीच कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याने गेल्या ७ वर्षांपासून कसोटी संघाचे नेतृत्व केले. या कालावधीत त्याने भारतीय संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. ज्यावेळी त्याला भारतीय संघाचे कर्णधारपद मिळाले होते, त्यावेळी भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये ७ व्या स्थानी होता. आता हा संघ गेल्या काही वर्षांपासून पहिल्या स्थानी आहे. दरम्यान विराट कोहली नंतर पुढील कर्णधार कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
विराट कोहलीने (Virat Kohli captaincy) वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी रोहित शर्माला देण्यात आली होती. तर कसोटी संघाच्या उपकर्णधाराची जबाबदारी देखील रोहित शर्माला देण्यात आली होती. आता विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळणार का? की, रोहित शर्माचा (Rohit Sharma) वर्कलोड कमी करण्यासाठी ही जबाबदारी केएल राहुलला दिली जाणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.
व्हिडिओ पाहा- विराटने कसोटीकर्णधारपद सोडताना का घेतले धोनी-शास्त्रीचं नाव
अशात इनसाईड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने संगितले की, “रोहित शर्मा कसोटी संघाचा पुढील कर्णधार असेल. बीसीसीआय १९ जानेवारीपासून सुरू होणारी वनडे मालिका झाल्यानंतर हा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर करणार आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “यात काहीच शंका नाहीये की, रोहित शर्मा कसोटी संघाचा पुढील कर्णधार असेल. कारण रोहित शर्माला दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होण्यापूर्वी कसोटी संघाचे उपकर्णधारपद दिले गेले होते. आता विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहितला कसोटी संघाचे संघाचे कर्णधारपद दिले जाऊ शकते. हे लवकरच अधिकृतरीत्या जाहीर केले जाईल.”
कोण असेल कसोटी संघाचा उपकर्णधार?
तसेच रोहित शर्माला कसोटी संघाचे कर्णधारपद दिले गेले तर या संघाचा उपकर्णधार कोण असेल? हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. आता बीसीसीआय केएल राहुल आणि रिषभ पंत यांना या जबाबदारीसाठी तयार करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, “चर्चा या गोष्टीची होत नाहीये की, पुढील कर्णधार कोण असेल? तर, चर्चा या गोष्टीची होतेय की, पुढील उपकर्णधार कोण असेल?. कारण भविष्याचा विचार करता कुठल्याही खेळाडूला ही जबाबदारी दिली जाऊ शकते.”
केएल राहुल (Kl Rahul), रिषभ पंत (Rishabh pant) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah)हे भविष्यातील लीडर आहे. निवडकर्ते या खेळाडूंपैकी एकाला ही जबाबदारी देऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या :
क्रिकेटचे जन्मदाते इंग्लंड तरसतायेत एका कसोटी मालिका विजयासाठी! नजीकची कामगिरी लाज आणणारी
विराटच्या राजीनाम्यानंतर तापले राजकारण! ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा जय शहांना टोला
हे नक्की पाहा: