क्रिकेट इतिहासात गुलाबी चेंडूनं पहिला कसोटी सामना 2015 साली खेळला गेला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेलेला हा सामना रोमांचकारी होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियानं किवी संघाचा 3 गडी राखून पराभव केला. आता कांगारूंनी ॲडलेडमध्ये भारताचा 10 गडी राखून पराभव केला आहे, जो गुलाबी चेंडूच्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा 13वा विजय आहे.
गुलाबी चेंडूनं खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला आतापर्यंत फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचा हा पराभव यावर्षी जानेवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाला होता. आता प्रश्न हा आहे की, गुलाबी चेंडूच्या कसोटीत कांगारू संघाला पराभूत करणं जवळपास अशक्य का आहे? या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
कोणत्याही संघाचा पाया तेव्हाच मजबूत होतो, जेव्हा खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये भरपूर संधी दिल्या जातात. गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या कामगिरीचं एक कारण म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड देशांतर्गत सामनेही गुलाबी चेंडूनं आयोजित करतो. याचा सरळ अर्थ असा की, ऑस्ट्रेलियात गुलाबी चेंडूनं क्रिकेट खेळण्याची प्रतिभा देशांतर्गत स्तरावरच विकसित होत आहे, मग तो गोलंदाज असो वा फलंदाज.
नॅथन मॅकस्वीनी हे याचं जिवंत उदाहरण आहे. मॅकस्विनीनं ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात क्रिझवर ठाम उभं राहून 39 धावांची खेळी केली होती. हा तोच मॅकस्वीनी आहे, ज्यानं ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक टूर्नामेंट शेफिल्ड शील्ड 2023/2024 मध्ये 10 सामने खेळताना 762 धावा केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियानं गुलाबी चेंडूनं आतापर्यंत सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियन संघ गुलाबी चेंडूनं आतापर्यंत 13 सामने खेळला असून, ज्यापैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. इंग्लंडनं गुलाबी चेंडूनं आतापर्यंत 7, तर भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 5 कसोटी खेळल्या आहेत. याशिवाय श्रीलंका, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांना गुलाबी चेंडूनं सामने खेळण्याचा अनुभव आहे.
हेही वाचा –
या कारणामुळे रिषभ पंत मेगा लिलावात उतरला, मुख्य प्रशिक्षकांचा खळबळजनक खुलासा!
बांगलादेशने अंडर 19 आशिया चषक जिंकला, फायनलमध्ये भारताचा एकतर्फी पराभव!
ॲडलेडमध्ये इतिहास घडला! भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना फक्त इतक्या चेंडूत संपला!






