इंग्लंडमध्ये सध्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 71 वी ऍशेस मालिका सुरु आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू जी जर्सी वापरत आहेत, या जर्सीच्या कॉलरवर एक सोनेरी फुलाचे चिन्ह आहे. या चिन्हाची सध्या मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
हे फुल हे एक संघ म्हणून आदिवासी आणि टोरेस स्ट्रेट आयलँडर लोकांप्रती सलोख्याचे आणि एकात्मतेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.
इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार हे फुल ज्याला ‘वॉकआउट विकेट्स’ असे नाव असून हे ऑस्ट्रेलियन मूळ कलाकृतीचे प्रतिनिधित्व करते. या फुलाची मूळ कलाकृती 1868 मध्ये इंग्लंड दौरा केलेल्या अग्रगण्य आदिवासी संघाचे सदस्य असलेल्या मॉस्किटो यांची पणती आंटी फिओना क्लार्क यांची आहे.
ही कलाकृती भूतकाळातील, वर्तमानातील आणि भविष्यातील आदिवासी क्रिकेटपटूंचे वर्णन करते. या कलाकृतीमधील मोठे वर्तृळ लॉर्ड्स मैदानाचे प्रतिनिधित्व करते. 1868 मध्ये अदिवासी संघाने केलेल्या इंग्लंड दौऱ्यातील अनेक प्रसिद्ध मैदानांपैकी ते एक मैदान होते. तसेच या कलाकृतीमधील छोटे वर्तृळ हे संघाने अन्य ठिकानांना दिलेल्या भेटींना सुचित करते.
तसेच यातील उडणारे स्टम्प म्हणजे इंग्लंडच्या स्वत:च्या खेळात अदिवासी संघाने इंग्लंडपेक्षा चांगली कामगिरी केली होती. तसेच स्टम्पवर कोणतेही बेल्स नसणे म्हणजे खेळ सातत्याने विकसित होत आहे.

या ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांनंतर सध्या ऑस्ट्रेलिया संघ 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामना अनिर्णित राहिला.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेत विलियम्सन नाही तर हा खेळाडू करणार न्यूझीलंडचे नेतृत्व
–तिसऱ्या ऍशेस सामन्यासाठी असा आहे इंग्लंडचा संघ, हा अनुभवी खेळाडू सामन्यातून बाहेर
–या कारणामुळे केन विलियम्सन, अकिला धनंजया सापडले अडचणीत, आयसीसी घेणार निर्णय