क्रिकेट पाहताना अनेकदा खेळाडूंना सामन्यावेळी पँटवर चेंडू घासताना आपण पाहातो. त्यांना पाहून अनेकजण कधीतरी आपल्या गल्ली क्रिकेटमध्ये अशाप्रकारची स्टाईल नक्कीच मारतानाही दिसतात. पण तुम्हाला असा कधी प्रश्न पडलाय का? की हे खेळाडू चेंडू घासतात तरी का? आणि हो हे खेळाडू एकाच बाजूने चेंडू घासतात. पण का? या सर्वांची उत्तरेच या लेखातून देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.
आपल्या सर्वांनाच माहितीये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिकेटचे ३ प्रकार आहेत. वनडे, टी२० आणि कसोटी. वनडे आणि टी२०ला मर्यादित षटकांचा क्रिकेट प्रकार म्हणून ओळखलं जातं. यात पांढरा चेंडू वापरला जातो, तर कसोटीत लाल चेंडू वापरला जातो. या तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळाडू, मग तो गोलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षक, चेंडू आपल्या पँटवर घासत असतात. या घासण्याचा अर्थ आहे तरी काय? तर याचा अर्थ असाये की, जेव्हा खेळाडू हा चेंडू पँटवर घासतात, तेव्हा त्या चेंडूला शाईन मिळते.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेळाडू हा चेंडू पँटवर एकाच बाजूने घासतात. एका बाजूने चेंडूला शाईन मिळते, त्याचा फायदा हा वेगवान गोलंदाजांना होतो. जेव्हा चेंडू सारखा सारखा टाकून जुना होतो, तेव्हा त्या चेंडूची खालची बाजू सॉफ्ट होते आणि त्यावर व्रण उमटतात. यामुळं होतं असं की, धूळ, माती आणि बारीक सारीक कण त्यात जाऊन बसतात. त्यामुळं वेगवान गोलंदाज जेव्हा चेंडू टाकण्यासाठी धाव घेतात, तेव्हा त्यांना कठीण चेंडू हवा असतो. कारण, कठीण चेंडू जेव्हा खेळपट्टीवर आदळला जातो, तेव्हा तो उसळी घेऊन फलंदाजाच्या दिशेने वेगात जातो. त्यामुळे चेंडूची एक बाजू कठीण करण्यासाठी खेळाडू तो घासतात आणि चेंडू घासताच त्यावर असलेली धूळ, माती, आणि व्रण निघून जातात. यानंतर गोलंदाजाला मिळतो कठीण चेंडू.
आता एकाच बाजूने चेंडू का घासला जातो? असा प्रश्नही असेल, तर एका बाजूने चेंडू घासल्यानंतर जी शाईन मिळते, त्यामुळे गोलंदाजाला स्विंग मिळतो. वेगवान गोलंदाज जेव्हा गोलंदाजी करायला जाईल, तेव्हा तो चेंडू खाली पडताच त्या बाजूने रिव्हर्स स्विंग होतो. जर चेंडू स्विंग झाला, तर ते फलंदाजांना आरामात चकवू शकतात. आणि बॅटची कड घेऊन चेंडू स्लीपला किंवा पाठीमागच्या खेळाडूच्या हातात जाण्याची शक्यता जास्त असते आणि जेव्हा चेंडू शाईनी असतो, तेव्हा तो तितक्याच वेगातही जातो.
कधी- कधी चेंडू शाईन करण्यासाठी खेळाडू त्याला लाळही लावतात. पण कोरोनाने जो काही थैमान घातला होता, त्यामुळे लाळ वगैरे लावण्यावर बंदी घालण्यात आलीये. असं असलं, तरीही शाईनी चेंडूचा फायदा वेगवान गोलंदाजांसोबतच फिरकी गोलंदाजांनाही होतोच होतो. त्यामुळे चेंडू खेळपट्टी पडताक्षणीच फिरतो (Why cricketers rub balls to their pant in Cricket).
हल्ली चेंडू हा शक्यतो गोलंदाजच घासतात. पण पूर्वी प्रत्येक संघात एक बॉल शाईनर असायचा. जो चांगल्याप्रकारे बॉल शाईन करून द्यायचा. भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाणारे राहुल द्रविड चेंडू शाईन करून बऱ्याचदा द्यायचे. कारण ते चेंडू शाईन करण्यात एक्सपर्ट होते. दुसरीकडे इंग्लंडमध्ये ऍलिस्टर कूक हे काम करायचा.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
विराट आणि सचिन यांच्यातील नाते सांगणारे ४ भन्नाट किस्से
सीईओ आणि संघ निवडीवर श्रेयस अय्यरचे स्पष्टीकरण; म्हणाला, ‘ज्यांना संधी मिळत नाही, त्यांना…’
दक्षिण आफ्रिकेच्या नवख्या अष्टपैलूला राजस्थान रॉयल्सने दिली संधी, पाहा त्याची कारकीर्द