इंडियन प्रीमिअर लीगचा (आयपीएल) १५वा हंगाम आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपला आहे. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच अवघ्या आयपीएल चाहत्यांना धक्का देणारी बातमी आली. ती अशी की, आतापर्यंत आयपीएल फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स संघाला ४ वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार एमएस धोनीने नेतृत्व सोडण्याची. धोनी कर्णधारपदावरून हटल्यानंतर चेन्नईने आपल्या नव्या कर्णधाराची धुरा अनुभवी आणि विस्फोटक अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाकडे सोपवण्यात आली. मात्र, जडेजाकडेच संघाचे नेतृत्व का सोपवण्यात आले हा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. या लेखातून आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत. (Chennai Super Kings)
रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात पदार्पणाच्याच हंगामात म्हणजेच २००८ साली राजस्थान रॉयल्स संघातून केली होती. विशेष म्हणजे, आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदावर राजस्थाननेच आपले नाव कोरले होते. पुढील वर्षही जडेजाने राजस्थानचेच प्रतिनिधित्व केले. यानंतर २०१० साली त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. पुढच्या २०११च्या हंगामात त्याला कोची टस्कर्स केरला संघाने ४.३७ कोटी रुपयांत ताफ्यात सामील केले. मात्र, तो फक्त एकच हंगाम कोचीकडून खेळला. त्यानंतर जडेजाला २०१२ साली चेन्नई (Chennai Super Kings) संघाने जवळपास ९.७२ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात सामील केले. विशेष म्हणजे, जडेजा या हंगामातील चेन्नईचा सर्वात महागडा खेळाडू होता. जडेजा संघात येण्यापूर्वी चेन्नईने आयपीएलचे २ किताब (२०१० आणि २०११) आपल्या नावावर केले होते.
पहिल्यांदा चेन्नईकडून खेळताना जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीतून आपले योगदान दिले होते. त्याने फलंदाजी करताना १९ डावात १५.९१च्या सरासरीने १९१ धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त गोलंदाजीत त्याने १९ डावात ७.८०च्या इकॉनॉमी रेटने १२ विकेट्स घेतल्या होत्या. ही तर फक्त सुरुवात होती. पुढे एमएस धोनीने (MS Dhoni) जडेजावर टाकलेला विश्वास त्याने वेळोवेळी सार्थ ठरवला. फलंदाजीत असो किंवा गोलंदाजीत जडेजा सगळीकडेच उजवा ठरला. त्याने कधीही आपल्या कर्णधाराला नाराज केले नाही. जडेजा संघात असताना चेन्नईने आयपीएलचे पहिले विजेतेपद २०१८ साली पटकावले होते. या हंगामात जडेजाने ११ विकेट्स आणि ८९ धावांचे योगदान दिले होते.
पुढे २०१९ आणि २०२०च्या आयपीएल हंगामात जडेजाने आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवण्यात मोलाची कामगिरी केली होती. मात्र, संघाला किताब जिंकता आला नाही. त्यानंतर २०२१चा हंगाम आला आणि चेन्नईने अंतिम सामन्यात मुंबईला पराभूत करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. या हंगामात जडेजाने फलंदाजी करताना २२७ धावांचा पाऊस पाडला होता, तर गोलंदाजी करताना १३ विकेट्सही खिशात घातल्या होत्या.
📹 First reactions from the Man himself!#ThalaivanIrukindran 🦁💛 @imjadeja pic.twitter.com/OqPVIN3utS
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022
‘हे’ असू शकतं कारण
सन २०१२ ते २०२१ तब्बल १०वर्षे चेन्नई संघाचे प्रतिनिधित्व केली आहे. २०२१च्या आयपीएलनंतर एमएस धोनी निवृत्ती घेणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसं अधिकृतरीत्या काही आले नाही. संघ व्यवस्थापन आणि कर्णधाराने जी जबाबदारी दिली, ती जडेजाने वेळोवेळी उत्कृष्टरीत्या पार पाडली. कदाचित याचमुळे संघ व्यवस्थापनाने जडेजावर ही जबाबदारी सोपवली असावी. विशेष म्हणजे, जडेजाला २०२२ला चेन्नईने १६ कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते.
Oh Captain, 🦁ur Captain! #ForeverTHA7A 💛 pic.twitter.com/qfH4tNRcVI
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 24, 2022
जडेजाची कामगिरी
जडेजाच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत २०० सामन्यातील १५१ डावांमध्ये फलंदाजी करताना २७.११च्या सरासरीने २३८६ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना १७१ डावांमध्ये ७.६१च्या इकॉनॉमी रेटने १२७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
म्हणून आयपीएल भारीये.! रविंद्र जडेजाचा संघर्ष पाहून तु्म्हीही म्हणाल, ‘इथे कष्टाचं फळ मिळतंच’
चॅम्पियन ‘थाला’ | आयपीएलमध्ये धोनी म्हणजे कॅरम खेळताना नेहमी राणीचा विचार करणारा ‘मामू’