---Advertisement---

पंजाब किंग्जच्या जर्सीमधील सिल्व्हर रंगावर बीसीसीआयने का घातली बंदी? प्रीती झिंटाने सोडले मौन

On: मंगळवार, एप्रिल 28, 2026 6:14 PM
Paul-Valthaty
---Advertisement---

आयपीएल फ्रॅंचायजी पंजाब किंग्जची पहिली जर्सी सर्वांनाच आठवत असेल, लाल-सिल्व्हर रंगाची. बीसीसीआयने त्याच्यावर बंदी आणली आणि संघाने जर्सीचा रंग बदलला. मात्र बीसीसीआयने असे का केले याबद्दल संघाची सह-मालक प्रीती झिंटाने सोमवारी (२७ एप्रिल) खुलासा केला आहे. तिने सोशल मीडियामार्फत याचे स्पष्टीकरण दिले आहे. तर जर्सीच्या बंदीमागचे नेमके कारण जाणून घेऊ.

सोमवारी सोशल मीडियावर झालेल्या प्रश्न-उत्तर सत्रादरम्यान एका चाहत्याने प्रीतीला संघाने पुन्हा एकदा लाल-सिल्व्हर रंगाची जर्सी वापरावी असे म्हटले आहे. तेव्हा प्रीतीने स्पष्ट केले की सिल्व्हर रंगामुळे विरोधी संघांना चेंडू दिसण्यात अडथळा येत होता. त्यामुळेच जर्सीचा रंग बदलण्यात आला.

एक्सवर झालेल्या संवादावेळी त्या चाहत्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याने म्हटले की ऍडम गिलक्रिस्टने सिल्व्हर रंगाच्या जर्सीमध्ये त्याच्या कारकिर्दीतील एकमेव विकेट घेतली होती. ती जर्सी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम जर्सी आहे, असेही त्या चाहत्याने वर्णन केले.

यावर प्रीतीने म्हटले की, बीसीसीआयने सिल्व्हरवर बंदी घातली कारण संघांनी तक्रार केली होती की त्यांना सिल्व्हरवर पांढरा चेंडू दिसत नव्हता. तिने हे पण मान्य केले की त्या आकर्षक डिझाइनबद्दल चाहत्यांच्या भावनांशी ती सहमत आहे. तसेच तिने पुढे असेही म्हटले की तिलाही त्या सिल्व्हर जर्सीची आठवण येते.

कोणत्याही संघाला चुकीच्या मार्गाने फायदा मिळू नये, यासाठी बीसीसीआयने किटच्या रंगाबाबत कडक नियम ठेवले आहेत. त्या मार्गदर्शन तत्वानुसारच जर्सीचे रंग निश्चित केले गेले. सिल्व्हर रंगामुळे फलंदाज आणि क्षेत्ररक्षक दोघांनाही अडचण येते, त्यामुळे त्या रंगाच्या जर्सीवर बंदी घातली गेली.

आयपीएल २०२६ मध्ये पीबीकेएस सध्या एकमेव अपराजित संघ आहे. त्यांनी सात सामन्यांमध्ये सहा विजय मिळवले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. यामुळे ते १३ गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी आहेत. आज (२८ एप्रिल) त्यांचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध आहे. हा सामना मुल्लाणपूरमध्ये खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---