इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने शानदार गोलंदाज केली आहे विशेष म्हणजे तो आयपीएलच्या १४व्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२१मध्ये पर्पल कॅपचा मानकरी ठरला होता. त्यामुळे त्याला भारताच्या राष्ट्रीय संघाकडून टी२० क्रिकेटमध्ये खेळण्याची संधीही मिळाली होती. त्याने भारताकडून ८ टी२० सामनेही खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ११ विकेट्सची नोंद आहे. याव्यतिरिक्त यंदाच्या १५व्या आयपीएल हंगामात तो बेंगलोर संघाकडून खेळताना सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाजही बनला होता. अशात गुरुवारी (दि. १९ मे) गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने फक्त १ षटक गोलंदीज केली. यामागील कारण काय होते हे आपण जाणून घेऊया.
क्षेत्ररक्षणादरम्यान हाताला झाली दुखापत
गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाच्या डावादरम्यान हर्षल पटेल (Harshal Patel) ९व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकात त्याने ६ धावा दिल्या. गुजरातचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha) या षटकादरम्यानच धावबाद झाला. खरं तर प्रामुख्याने हर्षल अंतिम षटकात गोलंदाजी करतो. कर्णधार फाफ डू प्लेसिसने त्याला अंतिम षटकांसाठी राखून ठेवले होते. मात्र, सामन्यादरम्यान १३व्या षटकात चेंडू रोखताना हर्षलने स्वत:ला दुखापतग्रस्त केले आणि मैदानातून बाहेर गेला.
हातातून निघाले रक्त
हर्षल उजव्या हाताचा गोलंदाज आहे आणि त्याच्या त्याच हाताला चेंडू लागला. यावेळी त्याच्या हातातून रक्त निघत होते. याव्यतिरिक्त तो मैदानातून बाहेर निघून गेला आणि नंतर परतलाच नाही. त्याची दुखापत किती गंभीर आहे की, त्याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्याची दुखापत जर गंभीर असेल, तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. संघ अद्याप प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे आणि हर्षल त्यांच्यासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.
Harshal patel saying our season is over without uttering a word! 😶 pic.twitter.com/RUpKVeZVIz
— ɯlse (@pitchinginline) May 19, 2022
जूनमध्ये भारत खेळणार टी२० सामने
भारतीय क्रिकेट संघाला जून महिन्यात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध ५ टी२० सामने खेळायचे आहेत. त्यात संघाचे मुख्य खेळाडू भाग घेणार नाहीयेत. अशात हर्षल पटेलवर मोठी जबाबदारी असेल. दीपक चाहर आधीच दुखापतग्रस्त असल्याने बाहेर आहे. अशात आता हर्षल पटेल जर दीर्घ काळासाठी बाहेर झाला, तर भारतीय संघाच्या अडचणी वाढू शकतात.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हर्षल पटेलची आयपीएल २०२२मधील कामगिरी
हर्षल पटेलने आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंत १३ सामने खेळताना ७.६८च्या इकॉनॉमी रेटने १८ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान ३४ धावा देत ४ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
आयपीएल इतिहासातील पहिला वाद म्हणजेच ‘स्लॅप-गेट’
वडिलोपार्जित घराला टाळा ठोकत गांगुली जाणार नव्या घरी, आलिशान बंगल्याची किंमत वाचून उडेल झोप