---Advertisement---

कसोटीतील आपल्या कामगिरीवर नाखूश हे गिल; म्हणाला, “जेव्हा मी मागे वळून पाहिल, तेव्हा…”

On: बुधवार, सप्टेंबर 4, 2024 6:29 PM
Shubman Gill
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला या महिन्यात बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. यासाठीचा भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र, त्याआधी दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत भारताचे अनेक प्रमुख खेळाडू दिसणार आहेत. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडीसाठी ही स्पर्धा महत्त्वाचे मानली जात आहे. बांगलादेश संघाने नुकतेच पाकिस्तानला 2-0 ने क्लीन स्वीप करून खळबळ उडवून दिलीये. या सर्व परिस्थितीवर भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याने वक्तव्य केले आहे.

गिलला असा विश्वास आहे की, त्याची कसोटी कारकीर्द अपेक्षेनुसार अद्याप शिखरावर पोहोचली नाही. गिलने या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत जवळपास 500 धावा केल्या होत्या. जी त्याची कसोटी क्रिकेटमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता त्याला 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत आणखी सुधारणा करायची असून, ज्यामध्ये त्याच्यासमोर पाहुण्या संघातील अनुभवी फिरकीपटूंचे आव्हान असेल.

तो म्हणाला, ‘कसोटी क्रिकेटमध्ये माझी आतापर्यंतची कामगिरी माझ्या अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. मात्र, या हंगामात आम्हाला 10 कसोटी सामने खेळायचे आहेत. जेव्हा मी या सामन्यांनंतर मागे वळून पाहिल तेव्हा मला आशा आहे की, माझ्या अपेक्षा पूर्ण होतील. एक खेळाडू म्हणून वैयक्तिकरित्या परिपक्व होण्यावर भर मी देईल.”

शुबमन गिल याला भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जाते. सध्या तो भारताच्या वनडे व टी20 संघाचा उपकर्णधार आहे. कसोटी संघात त्याने सलामीवीर म्हणून सुरुवात केली होती. मात्र, चेतेश्वर पुजारा याच्या खराब कामगिरीनंतर आता गिल भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो.‌ बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर भारत न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात आणखी एक मालिका खेळेल. त्यानंतर वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाचा महत्त्वपूर्ण दौरा होणार आहे. या दौऱ्यात सर्वांची नजर गिलवर असेल.

हेही वाचा – 

WTC फायनलच्या फॉरमॅटमध्ये बदल करण्याची मागणी, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाची आयसीसीला महत्त्वपूर्ण सूचना
घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने गमावणारे 5 संघ, कोणाच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद?

महाराष्ट्राच्या पठ्ठ्याचा पॅरिसमध्ये डंका! सांगली जिल्ह्यातील सचिन खिलारीनं पॅरालिम्पिकमध्ये जिंकलं रौप्य पदक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---