पाकिस्तानच्या यजमानपदाखाली आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात केलेली आहे. स्पर्धेच्या तिकिटांची किंमत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने अतिशय स्वस्त ठेवली आहे. तरी देखील कराची स्टेडियम रिकामेच पाहायला मिळाले. यामुळेच सोशल मीडिया वरती पाकिस्तानची थट्टा केली जातीय.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा सुरुवातीचा सामना बुधवारी कराची मधील नॅशनल स्टेडियम वरती खेळला गेला.या सामन्यात पाकिस्तान आणि न्युझीलंड हे दोन संघ समोरासमोर होते. परंतु, सामन्यादरम्यान कराची स्टेडियम रिकामेच पाहायला मिळाले. स्टेडियम मध्ये चाहत्यांची गैरहजेरी होती.
आश्चर्यकारक बाब ही आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने सामन्यासाठी पाकिस्तानी रक्कम 1000 म्हणजेच (भारतीय रुपये 310) अशी तिकिटांची किंमत ठरवली होती. तरीदेखील स्टेडियम रिकामेच होते. पाकिस्तानमध्ये होणारे सर्व सामने कराची, लाहोर, रावळपिंडी या तीन स्टेडियम वरती खेळले जाणार आहेत. यामध्ये सर्वात स्वस्त तिकीट पाकिस्तानी रक्कम 1000 म्हणजेच (भारतीय रुपये 310) इतकीच ठेवली आहे.
रावळपिंडी मध्ये होणाऱ्या पाकिस्तान विरुद्ध बांग्देलादेश सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट पाकिस्तानी रक्कमेत 2000 म्हणजेच (भारतीय 620 रुपये) अशी किंमत ठरवली आहे. दुसरीकडे, भारतीय संघ आपले सर्व सामने दुबई मध्ये खेळणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे पूर्ण वेळापत्रक
19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्युझीलंड, कराची
20 फेब्रुवारी- बांग्लादेश विरुद्ध भारत, दुबई
21 फेब्रुवारी- अफगानिस्तान विरुद्ध साउथ आफ्रिका, कराची
22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहौर
23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
24 फेब्रुवारी- बांग्लादेश विरुद्ध न्युझीलंड, रावळपिंडी
25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध साउथ आफ्रिका, रावळपिंडी
26 फेब्रुवारी- अफगानिस्तान विरुद्ध इंग्लैंड, लाहौर
27 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश, रावळपिंडी
28 फेब्रुवारी- अफगानिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहौर
1 मार्च- साउथ आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची
2 मार्च- न्युझीलंड विरुद्ध भारत, दुबई
4 मार्च- सेमीफाइनल-1, दुबई
5 मार्च- सेमीफाइनल-2, लाहौर
9 मार्च- फायनल, लाहौर
10 मार्च- रिझर्व्ह डे
महत्वाच्या बातम्या :
भारतीय संघ निवडीत मोठी चूक? दिनेश कार्तिकने केले प्रश्न उपस्थित
CT 2025; पहिल्या सामन्यात किवींचा तडाखा, पाकिस्तानपुढे 320 धावांचे आव्हान!
“हा फिरकीपटू विरोधकांसाठी डोकेदुखी ठरेल!” – रिकी पाँटिंगच्या विधानाने चर्चांना उधाण






