बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी (२९ जुलै) भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक रोमांचक सामना झाला. विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन गडी राखून पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत सात गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला.
या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी घटना घडली, जेव्हा नवव्या षटकात सलामीवीर शफाली वर्माला जीवदान मिळाले. भारतीय संघाची धावसंख्या १ बाद ६५ असताना शफाली भाग्यवान ठरली. फिरकीपटू ताहिला मॅकग्राने शफाली वर्माला चकवले आणि यष्टिरक्षक ऍलिसा हिलीने चपळाई दाखवत शफालीला यष्टिचीत केले. मैदानावरील पंचांनी अंतिम निर्णय देण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. अनेक रिप्ले पाहिल्यानंतर तिसऱ्या पंचांनी शफालीच्या बाजूने निर्णय दिला. त्यामुळे शफाली नाबाद ठरली.
क्रीझच्या भरपूर बाहेर असलेल्या शफालीला नाबाद का देण्यात आले? याचा अनेकांना उलगडा होत नव्हता. क्रिकेटच्या नियमांनुसार, खेळाडू ज्या हाताने स्टंप किंवा बेल्सला स्पर्श करतो, त्याच हातात चेंडू असणे आवश्यक आहे. मात्र, हिलीने तसे केले नाही. हिलीच्या डाव्या हातात चेंडू होता, तर तिने उजव्या हाताने बेल्स हलविलेल्या. यामुळेच तिसऱ्या पंचांनी शफाली वर्माला नाबाद घोषित केले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या नुकसानावर १५४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने १९ षटकातच ७ विकेट्स गमावत भारताचे लक्ष्य पूर्ण केले. भारतीय संघ स्पर्धेतील आपले आव्हान टिकवण्यासाठी ३१ जुलै रोजी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल. पाकिस्तानलाही आपल्या पहिल्या सामन्यात बार्बाडोसविरूद्ध पराभव पत्करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
आनंदाची बातमी! क्रिकेटच्या मैदानात पुन्हा होणार ‘दादागिरी’, कसं ते घ्या जाणून
CWG 2022: टपरी चालवणाऱ्या बापाचे कष्ट फळले! २१व्या वर्षी मुलाने भारताला मिळवून दिलं पदक
‘द्रविडच्या विचारांचा संघाला फायदा नाही’, महत्त्वाच्या खेळाडूला बाहेर ठेवल्यामुळे भडकला माजी दिग्गज