---Advertisement---

संघ व्यवस्थापनाचा ढिसाळ निर्णय आणि…., जाणून घ्या भारताच्या पराभवाची पाच मोठी कारणं

---Advertisement---

राजकोटच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंड संघाने दमदार पुनरागमन केले आहे. मालिकेतील उत्साह अजूनही चाहत्यांमध्ये आहे. पण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला या सामन्यात पराभव का सहन करावा लागला? त्याची पाच कारणे जाणून घेऊयात. या पराभवासाठी कॅप्टन सूर्या देखील एक प्रकारे जबाबदार आहे. त्याच्याशिवाय, सलामीवीर संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरला. तर वॉशिंग्टन सुंदरला प्रभाव पाडता आला नाही.

पाहा टीम इंडियाच्या पराभवामागची कारणे

1 संजू सॅमसन फेल

सलामीवीर संजू सॅमसन या मालिकेत मोठा फ्लॉप ठरला आहे. तो 140 पेक्षा वेगवान चेंडूंवर बाद होत आहे. तिन्ही वेळा जोफ्रा आर्चरचा बळी ठरला आहे. संजूच्या लवकर बाद होण्यामुळे संघावर दबाव आला. अशाप्रकारे, ते पराभवाचे मुख्य कारण होते.

2 वॉशिंग्टनने सुंदरकडून निराशा 

अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने अडथळा निर्माण केला. वॉशिंग्टनने एक षटक टाकले ज्यात 15 धावा दिल्या. तर जेव्हा तो फलंदाजीसाठी आला तेव्हा त्याला 15 चेंडूत फक्त 6 धावा करता आल्या. तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आला.

3 सूर्या-तिलक वर्मा फ्लाॅप

कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर आला. पण तो 7 चेंडूत 17 धावा करून तो बाद झाला. तर तिलक वर्मा 14 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. या दोघांच्या झटपट विकेट गेल्याने संघावर दबाव आला, नंतर संघ सावरू शकला नाही.

4 जुरेलचे डिमोशन

संघ व्यवस्थापनाने ध्रुव जुरेलला पूर्णपणे फलंदाज आणि फिनिशर म्हणून खेळवले पण अक्षर पटेल बाद झाल्यावर त्याला 8 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. अशा परिस्थितीत त्याच्यावर दबाव होता कारण खूप कमी चेंडू शिल्लक होते. व्यवस्थापनाचा हा निर्णय संघाच्या विरोधात होता.

5 शमी फिका पडला

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. तर त्याच खेळपट्टीवर दुखापतीतून परतताना मोहम्मद शमी फिका दिसत होता. त्याला एकही यश मिळाले नाही. संघावर दबाव येण्याचे हेच कारण होते. त्याने 3 षटकांत 25 धावा दिल्या.

हेही वाचा-

IND VS ENG; इंग्लंंडचा कमबॅक, राजकोटमध्ये भारताचा निसटता पराभव
‘आयसीसी पुरूष क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाल्यानंतर बुमराह म्हणाला…
IND vs ENG; वनडे मालिकेपूर्वी शुबमन गिल नेट्समध्ये वडिलांसोबत करतोय सराव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---