शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकदिवसीय मालिका रविवारी (२४ जुलै) नावावर केली. मालिकेतील पहिला सामना भारताने ३ धावांनी जिंकला होता आणि आता दुसऱ्या सामन्यात भारताने २ विकेट्स राखून विजय मिळवला. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या केल्यानंतर भारतीय फलंदाजांनी देखील त्यांच्या तोडीस तोड प्रदर्शन केले. सलामीवीर शुबमन गिल चांगल्या लयीत दिसत होता, पण स्वतःच्या एका चुकीमुळे त्याला विकेट गमवावी लागली.
कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि शुबमन गिल (Shubman Gill) भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आले. धवनने या सामन्यात ३१ चेंडूंमध्ये अवघ्या १३ केल्या आणि कायल मेयर्स (Kyle Mayers) झेलबाद झाला. धवनचा झेल घेतल्यानंतर मेयर्सने गोलंदाजीतही कमाल दाखवली. धवन बाद झाल्यानंतर गिलने पुढे महत्वापूर्ण खेळी केली, पण मेयर्सच्या चेंडूवर एक चुकीचा शॉट खेळल्यामुळे विकेट गमावून बसला.
डावातील १६ व्या षटकात कायल मेयर्स गोलंदाजी करत होता. षटकातील चौथ्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या गिलने चेंडू यष्टीरक्षकाच्या मागे मारण्याचा प्रयत्न केला, पण याच प्रयत्नात तो बाद झाला. गिल या चेंडूवर स्कूप मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू योग्य पद्धतीने बॅटवर आला नाही. चेंडू बॅटच्या तळावर लागला आणि गोलंदाजी करणाऱ्या मेयर्सने तो झेलला. गिलने विकेट गमावली, तेव्हा संघाची धावसंख्या ६६ होती.
.@ShubmanGill tried to hit behind the keeper and completely missed it.
Watch the India tour of West Indies LIVE, only on #FanCode👉 https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket pic.twitter.com/nq8vfpz5LL
— FanCode (@FanCode) July 24, 2022
गिलच्या विकेटनंतर मायर्स डावातील १८ व्या षटकात पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी त्याने सूर्यकुमार यादवची विकेट घेतली. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमारे कवर्सच्या दिशेने एक जोरदार शॉट खेळला, पण चेंडू मात्र त्याच्या बॅटवर व्यवस्थित बसला नाही. बॅटच्या आतमधील किनाऱ्याला लागलेला चेंडू थेट स्टंप्समध्ये घुसला आणि सूर्यकुमार त्रिफळाचीत झाला. अशा प्रकारे संघाची धावसंख्या ७९ असताना भारताने तीन महत्वाच्या विकेट्स गमावल्या होत्या.
#KyleMayers, the magician strikes again! @surya_14kumar walks back without adding much to the score board.😢
Watch the India tour of West Indies LIVE, only on #FanCode👉 https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/YAi3ntJzZV
— FanCode (@FanCode) July 24, 2022
परंतु त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसनने वैयक्तिक अर्धशतके ठोकली आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. श्रेयसने ७१ चेंडूत ६३ धावा केल्या, तर सॅमसनने ५१ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्सच्या नुकसानावर भारतापुढे विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने हे लक्ष्य ४९.४ षटकात आणि ८ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. या विजयानंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत ०-२ अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
WI vs IND | वेस्ट इंडीजविरुद्ध मिळालेल्या यशाचे श्रेय आयपीएललाचं, वाचा शिखर धवन काय म्हणाला
‘बापू’ तारी बॅटिंग कमाल छे! अक्षर पटेलच्या मॅच विनिंग षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
थरारक विजयासह वनडे मालिका टीम इंडियाच्या नावे; संजू-अक्षर ठरले विजयाचे शिल्पकार