वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताला पहिला पराभव मिळाला. सोमवारी (१ ऑगस्ट) मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला, जो वेस्ट इंडीजने ५ विकेट्सने जिंकला. तत्पूर्वी मालिकेतील पहिला सामना भारताने ६८ धावांच्या मोठ्या अंतराने नावावर केला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही आणि याच कारणास्तव वेस्ट इंडीजचा विजय सोपा झाला. पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा याने फलंदाजांविषयी नाराजी बोलून दाखवली.
दुसरा सामना भारताने गमावल्यानंतर पाच टी-२० सामन्यांची ही मालिका १-१ अशा बरोबरीवर आली आहे. सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने पराभवाचे खापर संघातील फलंदाजांवर फोटले. तो म्हणाला की, “सर्वात महत्वाचे म्हणजे, आम्ही धावा कमी केल्या होत्या. आम्ही चांगली फलंदाजी केलीच नाही. खेळपट्टी चांगली होती. मात्र, आम्ही स्वतः चांगले प्रदर्शन करू शकलो नाही. परंतु जेव्हा तुम्हाला फलंदाजी क्रमासोबत काहीतरी (बदल) करू इच्छिता, तेव्हा असे होऊ शकते. तुम्ही प्रत्येक वेळी यशस्वी होत नसता, पण आम्ही या पराभवातून धडा घेऊ.” फलंदाजांच्या खराब प्रदर्शनामुळे रोहित नाराज असला तरी, गोलंदाजांवर मात्र तो खूपच खुश आहे.
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याची दोन षटके शिल्लक असताना देखील रोहितने शेवटच्या षटकात नवख्या आवेश खान याला गोलंदाजी दिली. रोहितच्या या निर्णयामुळे भारतीय संघाचा पराभव झाला, असे अनेकांचे मत आहे. रोहितने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, “आम्हाला माहिती होते की, भुवनेश्वरने संघासाठी अशी कामगिरी यापूर्वी केली आहे आणि सामने वाचवले आहेत. पण जोपर्यंत तुम्ही आवेश किंवा अर्शदीप सिंग यांना अशा पद्धतीची संधी देणार नाही, तोपर्यंत त्यांची गुणवत्ता कशी समजेल. या सर्व गोलंदाजांकडे गुणवत्ता आहे, फक्त त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे.”
“मला माझा संघ आणि गोलंदाजांचा अभिमान आहे. अशा प्रकारचे लक्ष्य १३-१४ षटकांमध्ये गाठले जाऊ शकते, पण आम्ही सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. मी गोलंदाजांवर खूप खुश आहे. फलंदाजांच्या काही गोष्टींवर लक्ष द्यावे लागेल. परंतु, मी हे वारंवार म्हणेल की फलंदाजीतही आम्हाला अशाच प्रकारचा दृष्टीकोण हवा आहे,” असेही रोहित पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर भारताने प्रथम फलंदाजी करताना १३८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजने हे लक्ष्य १९.३ षटकांमध्ये ५ विकेट्सच्या नुकसानावर गाठले. रोहित शर्मा या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला. हार्दिक पंड्याने भारतासाठी सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
या श्रेयसच करायचं काय? मागील सहा सामन्यात ठरलाय भलताच अपयशी
दुसऱ्या टी२० मध्ये नाणेफेकीचा कौल यजमानांच्या बाजूने; भारतीय संघात महत्त्वाचा बदल
मेकॉय पुढे टीम इंडियाची वाताहात! दुसरा टी२० जिंकत यजमानांनी मालिका आणली बरोबरीत






