पोर्ट ऑफ स्पेनमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज सांघातील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याचा तिसरा दिवस वेस्ट इंडीजसाठी चांगला राहीला. वेस्ट इंडीजने तिसऱ्या दिवशी 67 षटकांमध्ये 143 धावा केल्या आणि चार विकेट्स गमावल्या. तिसऱ्या दिवसाखेर यजमान संघाची धावसंख्या 108 षटकांमध्ये 5 बाद 229 धावा असून भारतीय संघ अजून 209 धावांनी पुढे आहे. सलामीवीर क्रेग ब्रॅथवेट महत्वपूर्ण खेळी केली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रविचंद्रन अश्विन, मुकेश कुमार, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) याने 75 धावांची सर्वोत्तम खेळी केली. यासाठी त्याने 235 चेंडूंचा सामना केला आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याची शिकार बनला. मुकेश कुमारसाठी हा कसोटी पदार्पणाचा सामना असून त्याने खेळपट्टीवर सेट झालेल्या कर्क मॅकेन्झी तंबूचा रस्ता दाखवला. कर्क मॅकेन्झी याने 57 चेंडूत 32 धावांची खेली केली. जर्मेन ब्लॅकवुड 92 चेंडूत 20 धावा केल्यानंतर रविंद्र जडेजाच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेच्या हातात झेलबाद झाला. रहाणेने स्लीप्समध्ये जबरदस्त झेल पकडला. यष्टीरक्षक जोसुआ डा सिल्वा याने 26 चेंडूत 10 धावांची खेळी केली आणि मोहम्मद सिराजने त्याचा त्रिफला उढवला.
तत्पूर्वी दुसऱ्या दिवसाखे वेस्ट इंडीजने 1 बाद 86 धावा केल्या होत्या. टगेनरीन चंद्रपॉल याच्या रुपात यजमानांना पहिला झटका बसला होता. चंद्रपॉलने 33 धावांची खेली केली आणि जडेजाने त्याची विकेट घेतली. त्याआधी नाणेफेक जिंकल्यानंतर वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजीसाठी भारतीय संघाला आमंत्रित केले. पहिल्या डावात भारताने 128 षटकांमध्ये 438 धावा उभ्या केल्या. विराट कोहली याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा 500 वा सामना असून यात त्याने शनदार शतक केले. 206 चेंडूत विराटच्या बॅटमधून 121 धावां निघाल्या. (WI vs IND 2nd Test West Indies score 229/5 on Day 3 Stumps!)
महत्वाच्या बातम्या –
महाराजा टी20 ट्रॉफी: मयंक-पडिक्कलला पछाडत हा ‘अनकॅप्ड’ झाला मालामाल, मनिष पांडेला…
विनेश-बजरंगला दिलासा! विना ट्रायल एशियन गेम्स खेळण्याचा मार्ग झाला मोकळा