वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा युवा यष्टीरक्षक ईशान किशन मोठी खेळी करू शकला नाही. वैयक्तिक 25 धावा करून त्याने विकेट सोडली. चुकीचा शॉट खेळून त्याने विकेट गमावल्यामुळे भारताचा माजी दिग्गज गोलंदाज जहीर खान यानेही नाराजी व्यक्त केली. जहीरच्या मते आपण ज्या पद्धतीने बाद झालो, त्यावर स्वतः ईशान किशनदेखील नाखूश अले.
वेस्ट इंडीजविरुद्धचा हा दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. पहिल्या डावात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर संघ प्रथम फलंदाजीला आला. 128 षटकांमध्ये 438 धावा करून भारतीय संघ सर्वबाद झाला. यामध्ये ईशान किशन () याचे योगदान 37 चेंडूत 25 धावांचे होते. जहीर खान (Zaheer Khan) याच्या मते ईशान किशन कसोटी सामन्यात टी-20 क्रिकेटप्रमाणे खेळत होता, ज्यामुळे त्याने विकेट गमावली.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जहीर खान म्हणाला, “ईशान किशनने डावाची सुरुवात चांगली केली होती. त्यामुळे तो खूप निराश असे की, मोठी खेळी करता आली नाही. जेव्हा तुम्ही 30-40 धावा खेळता आणि 25 च्या आसपास धावा करता, तेव्हा खेळपट्टीवर सेट झालेले असता. कसोटी सामन्यात असे म्हटले जाते की, तुम्ही सुरुवातीलाच बाद झाला, तर ठीक आहे. पण जर अशा पद्धतीने बाद झाला, तर हे योग्य नसते. ईशान किशनने खेळल्या शॉटमध्ये खासकरून टी-20 क्रिकेटची झलक पाहायला मिळाली. त्याच्याकडे चांगली खेली करण्याची संधी होती, पण त्याला तसेच करता आले नाही. यासाटी तो निराश नक्कीच असेल.”
उभय संघांतील या कसोटीचा एकंदरीत विचार केला, तर दुसऱ्या दिवसाखेर वेस्ट इंडीजची धावसंख्या 1 बाद 86 धावा होती. वेस्ट इंडीजच्या केमार रोच आणि जोमेल वॅरिकन यांनी पहिल्या डावात भारताच्या प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी भारतासाठी विराट कोहली याने 206 चेंडूत 121 धावांची अप्रतिम खेळी केली होती. सलामीला आलेल्या यशस्वी जयसवाल (57) आणि कर्णधार रोहित शर्मा (80) यांनी अर्धशतके केली. तळातील फलंदाज रविंद्र जडेजा (61) आणि रविचंद्रन अश्विन (56) यांनीही पहिल्या डावात अर्धशतके ठोकली. (WI vs IND 2nd Test । Zaheer Khan expressed his displeasure at the cheap dismissal of Ishan Kishan)
महत्वाच्या बातम्या –
हरमनप्रीतचा रूद्रावतार! सामन्यानंतर काढले बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे वाभाडे, म्हणाली…
“सध्या बेअरस्टो जगातील सर्वोत्तम फलंदाज”, दिग्गजाने मॅंचेस्टर कसोटीतील खेळीनंतर वाहिली स्तुतीसुमने