भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघातील दुसरा वनडे सामना शनिवारी (दि. 29 जुलै) पार पडला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयात विंडीजचा कर्णधार शाय होप याने सिंहाचा वाटा उचलला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. यासह विंडीजने मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. सामन्यानंतर शाय होपने विजयामागील कारण सांगितले.
काय म्हणाला होप
वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार शाय होप (Shai Hope) भारतीय संघाच्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 80 चेंडूत नाबाद 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याच्या या खेळीमुळे संघाला सहजरीत्या विजय मिळवता आला. या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सामनावीर पुरस्कार पटकावल्यानंतर तो म्हणाला की, “जोपर्यंत माझे योगदान संघाला विजय मिळवून देत आहे, तोपर्यंत मी आनंदी आहे. जेव्हा परिस्थिती कठीण होते, तेव्हा तुम्ही वेगाने धावा करण्याचे मार्ग शोधता. अशात तुम्हाला धावा करताना अडचण येते. या सामन्यात आम्ही खूप जास्त दुहेरी धावा घेतल्या, ज्यामुळे आमच्यासाठी सोपे झाले. मी खूपच निश्चिंत आहे, आमचे लक्ष्य या मालिकेत पुनरागमन करणे होते. आम्हाला एका विजयासोबत मजबूत पुनरागमन करायचे होते. आम्ही मेहनत केली आणि योग्य दिशेने काम केले. आम्हाला हीच शिस्त प्रत्येक विभागात दाखवण्याची गरज आहे. हे सर्वप्रकारे चांगले प्रदर्शन होते. आम्ही आमच्या कमतरतेवर सुधारणा करून अंतिम सामन्याचा योग्य निकाल मिळवू.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघ पहिल्या विकेटसाठी 90 धावांच्या भागीदारीनंतर 40.5 षटकातच फक्त 181 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून ईशान किशन (Ishan Kishan) याने सर्वाधिक 55 धावांची भागीदारी रचली.
या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाने चांगली सुरुवात केली. मात्र, शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याने यजमानांच्या फलंदाजांना त्रास दिला. मात्र, त्यानंतर कर्णधार शाय होप याने मोर्चा सांभाळत टिच्चून फलंदाजी केली. त्याने या सामन्यात 80 चेंडूंचा सामना करत 63 धावांची खेळी साकारली. त्याने 2 चौकार आणि 2 षटकारही मारले. त्यानेच विंडीजसाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कीसी कार्टी यानेही नाबाद 48 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुलने सर्वाधिक 3 विकेट्स आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने 1 विकेट नावावर केली. (wi vs ind captain and player of the match shai hope told the reason for this win against team india know here)
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजहून परतताच अजिंक्य रहाणेचा धक्कादायक निर्णय, ‘या’ महत्त्वाच्या स्पर्धेतून माघारी घेतले नाव
‘हा’ संघ बनला Zim Afro T10चा पहिला-वहिला चॅम्पियन, 56 चेंडूत युसूफ पठाणच्या संघाचा खेळ खल्लास