वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाने टी-२० मालिकेतील पहिला सामना देखील नावावर केला. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) तारुबामध्ये खेळला गेला. भारताने या सामन्यात ६८ धावांनी विजय मिळवला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली असून दिनेश कार्तिक याच्या जबरदस्त खेळीमुळे संघाने मोठी धावसंख्या उभी केली.
भारतीय संघाने या सामन्यात शेवटच्या ४ षटकांमध्ये ५२ धावा केल्यामुळे संघाला विजय मिळू शकला. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने दिलेले योगदान सर्वात महत्वपूर्ण ठरले. कार्तिकने अवघ्या १९ धावांमध्ये २१६ च्या स्ट्राईक रेटने ४१ धावा केल्या. या धावा त्याने ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने केल्या. सातव्या विकेटसाठी त्याने रविचंद्रन अश्विनच्या साधीने महत्वाची भागीदारी देखील केली.
भारताच्या डावातील १९ व्या षटकात जेसन होल्डर गोलंदाजीसाठी आला होता. होल्डरच्या या षटाकातील पाचव्या चेंडूवर कार्तिकने खनखनीत षटकार मारला. त्यानंतर षटकातील शेवटच्या चेंडूवर देखील त्याने चौकार ठोकला. शेवटचे षटक वेगवान गोलंदाज ओबेड मेकॉय घेऊन आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने पुन्हा एकदा षटकार मारला. त्यानंतर चौथ्या आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून कार्तिकनेच डावाचा शेवट केला. अश्विनने खेळलेल्या १० चेंडूत नाबाद १३ धावांचे योगदान दिले.
कार्तिकच्या तुफानी खेळीमुळे भारतीय संघाने ६ विकेट्च्या नुकसानावर १९० धावा उभ्या केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघ मात्र अवघ्या १२२ धावांपर्यत मजल मारू शकला. या धावा करण्यासाठी वेस्ट इंडीजच्या ८ खेळाडूंना विकेट्स गमवाव्या लागल्या. वेस्ट इंडीजच्या एकाही फलंदाजाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. भारतीय संघासाठी कार्तिकप्रमाणेच कर्णधार रोहित शर्माची खेळीही महत्वाची ठरली. सलामीसाठी आलेल्या रोहितने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आधी सिक्स, फोर अन् मग डायरेक्ट घरचा रस्ता! पाहा भारतीय गोलंदाजाचा जोरदार कमबॅक
सूर्याचा धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न, आगळ्यावेगळ्या फटक्याला पाहून व्हाल अचंबित
महत्वाच्या सामन्यापूर्वी विंडीजचा माजी कर्णधार मैदानातच थिरकला, मजेशीर व्हिडिओ होतोय व्हायरल