बीसीसीआयने गुरुवारी (१४ जुलै) वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकदिवसीय मलािकेसाठीचा संघ बीसीसीआयने यापूर्वीच घोषित केला होता. आता टी-२० संघात मात्र अनेकांना पुनरागमनाची संधी मिळाली आहे. तसेच नवख्या आवेश खान आणि अर्शदीप सिंगलाही सामील केले गेले आहे. अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि भारताचे संपूर्ण वेगवान गोलंदाजी आक्रमण या टी-२० मालिकेत काय कमाल करते?, हे पाहावे लागणार आहे.
भारतीय दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमाराह (Jasprit Bumrah) वेस्ट इंडीजविरुद्धच्या या टी-२० मालिकेत सहभागी नाहीये. विराट कोहली आणि बुमराहला या मालिकेदरम्यान विश्रांती दिली गेली आहे. अशात या टी-२० मालिकेत अनुभवी भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) आणि इतर वेगवान गोलंदाजांवर संघाचे प्रदर्शन अवलंबून असेल. भुवनेश्वरच्या साथीला युवा अर्शदीप सिंग (Arshdeep Singh), आवेश खान (Avesh Khan) आणि हर्षल पटेल हे तिघे मिळून वेस्ट इंडीजविरुद्ध भेदक गोलंदाजी करतील.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी क्रमवारीत अव्वल असलेला जसप्रीत बुमराह विंडीजच्या दौऱ्यातून बाहेर, कारण माहितीय का?
अश्विनचं पुनरागमन, तर युवा बिश्नोईवरही जबाबदारी; विडिंजविरुद्ध भारताची फिरकी फळी आहे मजबूत!
IND vs WI: टीम इंडियात ‘या’ फिरकीपटूचे पुनरागमन, कारकीर्द वाचण्यासाठी करेल सर्वतोपरी प्रयत्न