आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियंत्रण करण्याचे काम आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद करते. अलीकडच्या काळात आयसीसी एका नियमाबाबत खूपच कडक निर्णय घेताना दिसत आहे. ते म्हणजेच षटकांची गती कमी राखण्याबाबत होय. नुकतीच ऍशेस 2023 मालिका संपली. या मालिकेतही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांना गोलंदाजी करताना षटकांची गती कमी राखल्यामुळे नुकसान सोसावे लागले. त्यानंतर आता वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या पहिल्या टी20 सामन्यानंतर आयसीसीने कारवाईचा बडगा उगारला. दोन्ही संघांनी षटकांची गती कमी राखली, त्यामुळे त्यांना सामन्यादरम्यान अतिरिक्त खेळाडू 30 यार्डामध्ये ठेवावे लागले आणि दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
भारत आणि वेस्ट इंडिजला दंड
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात एक षटक मागे राहिल्यामुळे भारतीय संघाला सामना शुल्काच्या 5 टक्के दंड ठोठावण्यात आला. तसेच, 2 षटके मागे राहिल्यामुळे वेस्ट इंडिजला सामना शुल्काच्या 10 टक्के दंड लावण्यात आला.
सामना अधिकारी रिची रिचर्डसन यांनी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि रोवमन पॉवेल (Rovman Powell) यांच्या संघांसोबत याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांना ही शिक्षा दिली. आयसीसीच्या रिपोर्टनुसार, पंड्या आणि पॉवेल यांनी ही शिक्षा मान्यही केली आहे. अशात या प्रकरणावर औपचारिक सुनावणीची गरज नाहीये. मैदानावरील पंच ग्रेगरी ब्रेथवेट आणि पॅट्रिक गस्टार्ड, तिसरे पंच नायजेल डुगुइड आणि चौथे पंच लेसली रीफर यांनीही सामना अधिकाऱ्यांच्या या शिक्षेचे कौतुक केले.
सामन्याचा आढावा
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघातील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडिअम येथे पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यांनी यावेळी निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 149 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावत फक्त 145 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने 4 धावांनी गमावला.
आता मालिकेतील दुसरा सामना 6 ऑगस्ट रोजी गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडिअमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. (wi vs ind west indies and india fined slow over captains teams accepted punishment read here)
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे…पृथ्वीचं नशीबच फुटकं! पदार्पणाच्या सामन्यात बाऊन्सर चेंडूवर बिघडलं संतुलन, स्वत:च मारली स्टम्पवर बॅट
The Hundred लीगमध्ये जॉर्डनचे रौद्ररूप! ‘एवढ्या’ चेंडूत ठोकल्या नाबाद 70 धावा, षटकारांची संख्या वाचाच