भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला. इंग्लंडने भारताला 10 विकेट्सने पराभूत केल्यामुळे भारताचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. भारतीय संघाच्या पराभवानंतर संघनिवडीवर प्रश्न उपस्थित झाले. विशेषत: फिरकीपटू युझवेंद्र चहल याला अंतिम 11 संघात न खेळवल्यामुळे सर्वत्र चर्चा झाली. भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल या स्पर्धेसाठीच्या 15 सदस्यीय संघाचा भाग होता. मात्र, त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. यापूर्वी टी20 विश्वचषक 2021मध्ये चहलला भारताच्या 15 सदस्यीय संघाचा भाग बनवण्यात आले नव्हते. त्यावेळी चहल खूपच निराश झाला होता. आता यावर भारताच्याच खेळाडूने मौन सोडले आहे.
दिनेश कार्तिक याने दिले उत्तर
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्याबद्दल भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने भाष्य केले. त्याने सांगितले की, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी युझवेंद्र चहल याला प्लेइंग इलेव्हनचा भाग का बनवले नाही.
कार्तिक म्हणाला की, “प्लेइंग इलेव्हनचा भाग न बनवल्यामुळे चहल बिल्कुल चिंताग्रस्त झाला नाही. कारण, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच चहलला सांगण्यात आले होते की, संघाची रणनीती काय असेल. त्यामुळे चहलला माहिती होते की, काय करायचे आहे. तसेच, संधी मिळताच चांगली कामगिरी करेल, यासाठी तो सातत्याने मेहनत करत होता.”
‘मला माहितीये प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाल्यावर कसं वाटतं’
दिनेश कार्तिक याने म्हटले की, “जेव्हा अशाप्रकारे कर्णधार आणि प्रशिक्षकाकडून एखादी भूमिका दिली जाते, तेव्हा खेळाडू म्हणून तुमचे काम सोपे होते. खरं तर, अशा परिस्थितीत तुम्हाला माहिती असते की, कुठे काम करण्याची गरज आहे. तुम्ही ते काम करता. अशाप्रकारे तुम्ही मैदानावर शानदार कामगिरी करू शकता.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “युझवेंद्र चहल यासाठी तयार होता की, त्याला जेव्हा प्लेइंग इलेव्हमध्ये सामील केले जाईल, तेव्हा तो आपले शंभर टक्के योगदान देईल. टी20 विश्वचषक ही माझ्यासाठी खूप मोठी स्पर्धा होती. एक खेळाडू म्हणून मला माहिती आहे की, प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाल्यावर कसे वाटते.”
याव्यतिरिक्त भारतीय संघ आता न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिला टी20 सामना शुक्रवारी (दि. 18 नोव्हेंबर) खेळला जाणार होता. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला. या दौऱ्यासाठी भारतीय संघात युझवेंद्र चहल याची निवड करण्यात आली आहे. या मालिकेत चहल काय कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Wicket Keeper Batsman dinesh karthik reacts to not making yuzvendra chahal a part of playing xi in t20 world cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याला मी रोखणार नाही, पण…’, आयपीएल 2023मधून बाहेर पडणाऱ्या कमिन्सचे ‘या’ अष्टपैलूबद्दल वक्तव्य
व्हिडिओ एक, मूड्स अनेक! आयसीसीने दाखवली विराटची टी20 विश्वचषकातील प्रत्येक रिऍक्शन, एकदा पाहाच