भारतीय क्रिकेट संघाचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. भारताला नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड आणि डिसेंबर महिन्यात बांगलादेश संघाचा दौरा करायचा आहे. यातील न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवड झालेला यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन नुकताच एका वेगळ्या प्रकारचा सराव करताना दिसला. त्याचा व्हिडिओ आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स संघाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओत संजू सॅमसन (Sanju Samson) टेनिस बॉलने फलंदाजीचा सराव करताना दिसला. सॅमसनने हे सर्व टेनिस बॉल शॉर्ट लेंथवर खेळले आणि मोठमोठे फटकेही मारले. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. तसेच, चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे की, सॅमसन भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यात (India Tour of New Zealand) चांगला खेळेल.
सॅमसन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करतो. तसेच, त्याच्या संघाने हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपल्या दिवसाची सुरुवात संजू सॅमसनला टेनिस चेंडू मारताना पाहून करा.”
https://www.instagram.com/reel/CkfB_65tCd9/?utm_source=ig_embed&ig_rid=dda4aab4-46bf-4475-95e6-7c0fef6833ea
भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर ते सध्या टी20 विश्वचकात खेळत आहेत. यानंतर भारताचा न्यूझीलंड दौरा 18 नोव्हेंबरपासून सुरू होईल. यामध्ये भारताला 3 टी20 आणि 3 वनडे सामने खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यासाठी संजू सॅमसनची निवड झाली आहे. यासोबतच यष्टीरक्षक म्हणून त्याच्यासोबत रिषभ पंत आणि ईशान किशनला निवडले आहे. कारण, कार्तिकला टी20 विश्वचषकानंतर विश्रांती दिली जाईल. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या असेल, तर वनडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनच्या खांद्यावर असेल.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-
हार्दिक पंड्या (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार/ यष्टीरक्षक), शुबमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), रिषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक), शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतापाठोपाठ धवनच्या खांद्यावर आयपीएलच्या ‘या’ संघाची जबाबदारी, तुम्हीही म्हणाल, ‘गब्बर छा गये तुम’
पाकिस्तानसाठी दुष्काळात तेरावा महिना, ‘हा’ स्फोटक फलंदाज दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यातून बाहेर