Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

टी20 वर्ल्डकपमध्ये रोहितच टॉपर! दिलशानला मागे टाकत केला ‘हा’ बलाढ्य विक्रम नावावर

टी20 वर्ल्डकपमध्ये रोहितच टॉपर! दिलशानला मागे टाकत केला 'हा' बलाढ्य विक्रम नावावर

November 3, 2022
in T20 World Cup, क्रिकेट, टॉप बातम्या
Rohit Sharma & R Ashwin

Photo Courtesy: Twitter/ICC


क्रिकेटविश्वात पुरूष संघांचा आठवा टी20 विश्वचषक (T20 World Cup)ऑस्ट्रेलियात सूरू आहे. या स्पर्धेत भारताच्या अनेक खेळाडूंनी विक्रम रचले. बुधवारी (2 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध नाबाद 64 धावांची खेळी करणारा विराट कोहली तर टी20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. हा सामना जिंकताच भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्याही नावावर मोठा विश्वविक्रम झाला.

रोहित शर्मा (Rohit Sharma) एकाच वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने (22) जिंकणारा कर्णधार तर ठरलाच. हा विक्रम करताना त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याचा मागील वर्षाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर त्याने टी20 विश्वचषकात सर्वाधिक विजयीही आपल्या नावे केले आहे. रोहित 2007पासून ते आतापर्यंत टी20 विश्वचषकाचे सगळे हंगाम खेळणारा शाकिब अल हसन बरोबरचा केवळ दुसराच खेळाडू आहे.

रोहितने टी20 विश्वचषकात आतापर्यंत 37 सामने खेळले आहेत. यातील 24 सामने जिंकत तो टी20 विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या विजयी खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याच्यानंतर श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान याचा क्रमांक लागतो. त्याने 2007-16 दरम्यान 35 सामने खेळताना 23 जिंकले आहेत. तसेच श्रीलंकेचा माजी सलामीवीर माहेला जयवर्धने, त्याचा संघसहकारी कुमार संगकारा आणि लसिथ मलिंगा, पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक यांनी प्रत्येकी 22 सामने जिंकले आहेत. Player with most matches win in T20 World Cup

रोहितने टी20 विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 921 धावा केल्या आहेत. टी20 विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीतील दिलशान, मलिक, जयवर्धने, संगकारा आणि मलिंगा हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. यामुळे रोहितचा हा विक्रम कोण मोडणार याबाबत उत्सुकता आहे.

पुरुषांच्या टी20 विश्वचषकातील सर्वाधिक विजयांमध्ये सहभागी होणारे खेळाडू (सामने):
24 – रोहित शर्मा (37)
23 – तिलकरत्ने दिलशान (35)
22 – शोएब मलिक (34)
22 – माहेला जयवर्धने (31)
२२ – कुमार संगकारा (31)
22 – लसिथ मलिंगा (31)

भारताचा पुढील सामना झिम्बाब्वे विरुद्ध आहे. हा सामना 6 नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकला की रोहितच्या नावावर कर्णधार आणि खेळाडू म्हणून आणखी एका विजयाची नोंद होईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: संजू सॅमसनने केला टेनिस बॉलचा सराव, एकापेक्षा एक शॉट मारताना दिसला पठ्ठ्या
विराट कोहली बनणार आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ! ‘या’ तिघांना मिळाले नामांकन


Next Post
Virat Kohli & Gautam Gambhir

पंचांना 'असे' बोलण्याचा विराटला अधिकार नाही! गौतम गंभीरने पुन्हा साधला निशाणा

Shaheen-Shah-Afridi

अवघ्या 22 वर्षांच्या वयात आफ्रिदी गाजला, आफ्रिकेच्या धुरंधरांना तंबूत धाडताच केला खास विक्रम

pakistan team

पाकिस्तानच्या उपांत्य सामन्यासाठीच्या आशा कायम! दक्षिण आफ्रिकेला 33 धावांनी चारली धूळ

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143