भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली मागच्या एका महिन्यात चांगले प्रदर्शन करताना दिसला आहे. चाहते मागच्या मोठ्या काळापासून विराटला त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये पाहण्यासाठी उत्सुक होते. अशात टी-20 विश्वचषकात त्याचा हा फॉर्म चाहत्यांना पाहायला मिळत आहे. आयसीसीने देखील विराटच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्याची दखल घेतली आहे. विराटला आयसीसी प्लेअर ऑप द मंथ पुरस्कारासाठी नामांकण मिळाले आहे.
आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी भारत, दक्षिण आफ्रिका आणि जिम्बाब्वे या संघांच्या प्रत्येकी एका खेळाडूला नामांकन मिळाले आहे. यामध्ये विराट कोहली (Virat Kohli) सोबत डेविड मिलर (David Warner) आणि सिंकदर रजा (Sikandar Raza) यांची नावे आहेत. विराट कोहलीला या मानाच्या पुरस्कारासाठी पहिल्यांदाच नामांकन मिळाले आहे.
विराट कोहली –
विराट कोहलीने मागच्या एका महिन्यात फक्त चार वेळा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु चार चार सामन्यांपैकी तीन वेळा त्याने नेत्रदीपक प्रदर्शन केले. टी-20 विश्वचषक 2022 मधील पहिला सामना भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळला आणि जिंकला देखील. भारताला विजयासाठी विराटने केलेल्या नाबाद 82 धावा सर्वात महत्वाच्या ठरल्या. भारताला विजयासाठी 160 धावांची आवश्यकता होती. संघाने पहिल्या चार विकेट्स अवघ्या 31 धावांवर गमावल्या असताना विराटने ही महत्वपूर्ण खेळी केली आणि पाकिस्तानला पराभूत केले.
तसेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातील भारत आणि दक्षिण आप्रिका यांच्यात गुवाहाटीमध्ये आमना सामना झाला होता. या सामन्यात विराटने अवघ्या 28 चेंडूत 49 धावा कुटल्या होत्या. टी-20 विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवला आहे. या सामन्यात विराटने 44 चेंडूत नाबाद 62 धावा कुटल्या. ऑक्टोबर महिन्यात शेवटचा सामना भारताने विश्वचषका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला. विराट या सामन्यात अवघ्या 12 धावांवर बाद झाला आणि संघाला देखील याची किंमत मोजावी लागली. भारताने आफ्रिकेविरुद्धच्या या सामन्यात पाच विकेट्सने पारभव स्वीकारला. विराटच्या ऑक्टोबरमधील एकंदरीत प्रदर्शनाचा विचार केला, तर त्याने एकूण 205 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 150.73 चा राहिला आहे.
डेविड मिलर –
दक्षिण आफ्रिका संघाचा मध्यक्रमातील फलंदाज डेविड मिलर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. ऑक्टोबर महिन्यात त्याने भारताविरुद्ध गुवाहाटीमध्ये अवघ्या 47 चेंडूत 106 धावा कुटल्या होत्या. परंतु स्वतःच्या संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकला नाही. असे असले तरी, त्यानंतर सुरू झालेल्या टी-20 विश्वचषकात त्याने चांगले प्रदर्शन सुरूच ठेवले. विश्वचषकात भारताविरुद्ध खेळताना त्याने पर्थमध्ये नाबाद 59 धावांची खेळी केली आणि स्वतःच्या संगाला यावेळी विजय देखील मिळवून दिला. आफ्रिकी संघाच्या या महत्वाच्या डावखुऱ्या फलंदाजाने ऑक्टोबर महिन्यात एकूम 303 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याचा स्ट्राइक रेट 146.37 चा राहिला आहे.
सिकंदर रजा –
झिम्बाब्वे संघाचा अनुभवी अष्टपैलू सिकंदर रजा ऑक्टोबर महिन्यात त्याच्या संघासाठी अप्रतिम प्रदर्शन केले. रजा टी-20 विश्वचषक 2022 मध्ये ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यावरून तो एक मोठा खेळाडू आहे, हे मात्र पक्के झाले आहे. आयर्लंडविरुद्ध खेळातना त्याने 47 चेंडूत 82 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि गोलंदाजाच्या रूपात 22 धावा खर्च कूरन एक विकेट घेतली. स्कॉटलँडविरुद्ध त्याने 23 चेंडूत 40 धावा केल्या आणि 20 धावा देऊन एक विकेट घेतल्या. रजा वेस्ट इंडीजविरुद्ध मात्र फलंदाजीत कमाल दाखवू शकला नाही. पाकिस्तानविरुद्ध केळताना त्याने 35 धावा खर्च करून तीन विकेट्सची कमाई केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘फेक फिल्डींग प्रकरण’, विराटवर ताशेरे ओढणाऱ्या ‘त्या’ बांगलादेशी खेळाडूला होऊ शकते आयसीसीकडून शिक्षा
कोहली ऍंड ऍडलेड कनेक्शन! विराटबाबत धोनीचा जुना व्हिडिओ का होतोयं व्हायरल?