---Advertisement---

ना धोनी ना अजून कोणी; भारतीय कसोटी इतिहासात ‘हा’ विक्रम करणारा यष्टीरक्षक पंत असेल पहिलाच

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 1:41 PM
Rishabh Pant
---Advertisement---

बुधवारपासून (२५ ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर उभय संघ आमनेसामने येणार आहेत. फलंदाजीस पोषक असलेल्या या मैदानावर दोन्ही संघाच्या फलंदाजांकडे धावांची बरसात करण्याची संधी असणार आहे. दरम्यान आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हासुद्धा मोठमोठे फटके मारताना दिसू शकतो. हाच पंत तिसऱ्या कसोटी सामन्यात षटकारांचा मोठा विक्रम करू शकतो.

पंत इतिहास रचण्याचा मार्गावर
भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या यष्टीरक्षकाने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम पंतच्या नावावर आहे. त्याने २०१८ साली कसोटीत एकूण १६ षटकार मारले होते. त्यावेळी त्याने माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा विक्रम मोडला होता. धोनीने पंतपूर्वी २००६ मध्ये सर्वाधिक १२ षटकार ठोकले होते.

यावर्षी पंतने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यांपर्यंत १५ षटकार मारले आहेत. जर त्याने लीड्स येथील हेडिंग्ले स्टेडियमवर होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात अजून २ षटकार मारले तर त्याचे २०२१ मध्ये एकूण १७ षटकार होतील. यासह तो एका वर्षात इतके षटकार मारणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनेल. सोबतच तो स्वत:चाच एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही मोडेल.

असे असले तरीही, पंत इंग्लंडविरुद्ध सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यात विशेष कामगिरी करू शकलेला नाही. त्याला आतापर्यंत साधे अर्धशतकही करता आलेले नाही. ३७ धावा ही त्याची इंग्लंड संघाविरुद्धच्या मालिकेतील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. परंतु फलंदाजांना मदत करणाऱ्या हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर तो पुन्हा लयीत येण्यासाठी प्रयत्नशील असेल.

अशात हा २३ वर्षीय यष्टीरक्षक फलंदाज २ षटकार मारत स्वत:चाच विक्रम मोडेल का आणि ऐतिसाहिक विक्रमाची आपल्या खात्यात भर पाडेल का हे पाहाणे रोमांचक असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

फलंदाजीस पोषक हेडिंग्ले मैदानावर कोहलीकडे २३००० धावा पूर्ण करण्याची सुवर्णसंधी, गरज आहे फक्त…

‘त्यांचे गोलंदाज कोणत्याही परिस्थितीत जिंकू शकतात’; भारताच्या गोलंदाजांना घाबरला इंग्लंडचा अव्वल फलंदाज

हेडिंग्लेवर ५४ वर्षांपासून अपराजित राहिलाय भारत, ‘विराट आणि कंपनी’ कायम ठेवू शकेल हा विक्रम?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---