आजपर्यंत अनेक क्रीडापटू राजकारणात उतरले आहेत. यात अनेक क्रिकेटपटूंचीही उदाहरणे आहेत. अगदी सचिन तेंडुलकरनेही खासदारकी सांभाळली आहे. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानला आमदारकी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रयत क्रांतीचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी राज्यपालांची भेट घेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावं सुचवली आहेत. यात त्यांनी दिग्गज गोलंदाज झहीरचेही नाव सुचवले आहे.
https://twitter.com/Dnyaneshwarkop/status/1331499244423839745
सदाभाऊ खोत यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना रयत क्रांती संघटनेतर्फे विनंती केली आहे की राज्यात अनेक नामवंत आहेत, ज्यांना आजपर्यंत कोठेही संधी मिळालेली नाही. पण त्यांचे आपल्या आपल्या क्षेत्रात काम सुरु आहे. अशा नामवंताना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्यात यावे.
झहीर खानची कारकिर्द –
झहीरने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ९२ कसोटी सामने खेळले असून यात त्याने ३११ विकेट्स, २०० वनडे सामन्यात २८२ विकेट्स आणि १७ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात १७ विकेट्स घेतल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
तसेच तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स(दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला आहे. त्याने आयपीएलमध्ये १०० सामने खेळताना १०२ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच तो सध्या मुंबई इंडियन्सचा क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतात क्रिकेटला पुन्हा सुरुवात! पहिल्याच सामन्याच मनोज तिवारी चमकला
धोनीला दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडूसाठी आयसीसीकडून नामांकन; काय आहे त्याची कामगिरी, वाचा
स्टिव्ह स्मिथला असा चेंडू टाकून करा बाद, सचिन तेंडुलकरने सांगितली आयडीया
ट्रेंडिंग लेख –
जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव वॉलाही ‘त्यादिवशी’ दादाने टॉससाठी पहायला लावली होती वाट
१९ वर्षीय पार्थिव पटेल थेट ऑस्ट्रेलियात स्टीव्ह वॉला नडला पण…






