गेल्या काही दिवसांपासून तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये दहशद माजवली आहे. तालिबान्यांच्या अमानुष छळाचा शालेय विद्यार्थी, महिला, सहकार क्षेत्र, व्यवसाय असा विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. दरम्यान, तालिबान्यांनी आता महिला क्रिकेटलाही विरोध केला असल्याचे समजत आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटने मोठे पाऊल उचलले आहे.
येत्या २७ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही पुरुष संघांमध्ये होबार्टच्या मैदानावर एकमात्र कसोटी सामना पार पडणार होता. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता हा कसोटी सामना न खेळण्याची धमकी दिली आहे.
तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपाध्यक्ष अहमदुल्लाह वासिक यांनी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटले होते की,”महिलांनी क्रिकेट खेळणे आवश्यक नाही.” ज्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टोकाची भूमिका घेत हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे क्रीडामंत्री रिचर्ड कोलबेक यांनीही या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे कारवाईची मागणी केली होती.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाबाबत बोलताना म्हटले की,”क्रिकट ऑस्ट्रेलिया जगभरातील महिला क्रिकेटच्या विकासाला अधिक महत्त्व देते. आमचे असे म्हणणे आहे की, खेळ हा सर्वांसाठी आहे आणि महिलांना ही सर्वच स्तरावर खेळण्याचा अधिकार आहे .”
अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जे सुरू आहे, ज्यामुळे तेथील लोक भयभीत झाले आहे. राशिद खानने देखील ट्विट करत, अफगाणिस्तानातील लोकांना वाचवण्याची मागणी केली होती.
तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे म्हटले की, “जसं की अहवालात म्हटले गेले आहे की, अफगानिस्तानमध्ये महिला क्रिकेटला समर्थन मिळणार नाही. जर असे झाले तर, होबार्टमध्ये होणारा कसोटी सामना रद्द करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही.”(Will not host Afghanistan men team in November if women are not allowed to compete says cricket Australia)
An update on the proposed Test match against Afghanistan ⬇️ pic.twitter.com/p2q5LOJMlw
— Cricket Australia (@CricketAus) September 9, 2021
काय म्हणाले होते वासिक?
अहमदुल्लाह वासिकने माध्यमांसोबत बोलताना म्हटले होते की, “क्रिकेटमध्ये असे असते की, तुम्ही चेहरा आणि शरीर झाकून ठेऊ शकत नाही. इस्लाम महिलांना असे चेहरा दिसू देण्याची परवानगी देत नाही. हा सोशल मीडियाचा काळ आहे. ज्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ शेअर केले जातील. इस्लाम आणि इस्लामी अमीरात महिलांना असे खेळ खेळण्याची अनुमती दिली जात नाही, ज्यामध्ये शरीर दिसेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीला मेंटॉर बनवलं खरं, पण नवीन वादाला झाली सुरुवात; बीसीसीआयला आलं तक्रारीचं पत्र
इंग्लंडने जाहीर केला टी२० विश्वचषकासाठी १५ जणांचा संघ, बेन स्टोक्सचा समावेश नाही
मोठी बातमी! टीम इंडियाचा आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह, सराव सत्र झाले रद्द