भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हनुमा विहारी या उन्हाळ्यात इंग्लंडमध्ये कौऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी जाणार होता. पण सध्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पहाता त्याला यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.
सध्या कोरोना व्हायरसचा परिणार अनेक क्रीडास्पर्धांवर झाला आहे. अनेक स्पर्धा रद्द किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. यामध्ये इंग्लंडमध्ये होत असलेल्या कौंटी सामन्यांचाही समावेश आहे.
याबद्दल पीटीआयशी बोलताना विहारी म्हणाला, ‘मी या मोसमात ४ कौंटी सामने खेळणार होतो. जेव्हा सर्व कागदपत्रांची कामे पूर्ण होतील तेव्हा मी याबद्दल तूम्हाला सर्व सांगेल. पण सध्यातरी कोरोना व्हायरसमुळे सर्वकाही थांबले आहे.’
26 वर्षीय विहारीला आपेक्षा आहे की तो एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या कौंटी क्रिकेट मोसमात खेळू शकेल. विहारी म्हणाला, ‘आशा आहे की एकदा परिस्थिती नियंत्रणात आली की मी ते सामने खेळू शकेल. या अनुभवातून मला शिकायला मिळेल.’
मागील काही वर्षात भारताचे काही खेळाडू कौंटी क्रिकेट खेळले आहेत. यात चेतेश्वर पुजारा, इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन असे खेळाडू कौंटी क्रिकेट खेळले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-इंग्लंडने उचलले मोठे पाऊल, क्रिकेटसाठी नक्कीच निराशाजनक गोष्ट
-कोरोनामुळे टी२० विश्वचषकावर परिणाम होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले हे उत्तर
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत दौऱ्यावरुन परतल्यावर द. आफ्रिकेच्या खेळाडूंना देण्यात आला हा इशारा
-कोरोनापासून वाचण्यासाठी टीम दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकांचे अजब उपाय