---Advertisement---

पावसाचा भारताला फायदा! 46 धावांवर ऑलआऊट होऊनही रोहित-सेना इतिहास रचण्याच्या मार्गावर…

On: शनिवार, ऑक्टोबर 19, 2024 12:07 PM
---Advertisement---

न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत पहिल्या दोन दिवसांत खूपच पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने चौथ्या दिवशी शानदार पुनरागमन केले. तिसऱ्या दिवसअखेर भारताचे पुनरागमन दिसत असले तरी चौथ्या दिवसाचे पहिले सत्र पूर्णपणे भारताच्या नावावर राहिले. या सत्रात भारताने एकही विकेट न गमावता 113 धावा केल्या असून न्यूझीलंडच्या आघाडीसाठी केवळ 12 धावा शिल्लक आहेत. पहिलं सत्र संपण्याआधीच पाऊस पडला. आता याचाही फायदा भारतालाच होणार आहे.

लंचब्रेकपूर्वी पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पाऊस थांबल्यानंतर चिन्नास्वामी येथे सामना सुरू होण्यास फारसा वेळ लागत नाही. मात्र, हवामानाच्या दृष्टीने पाऊस सलग येत राहू शकतो. अशा स्थितीत भारतालाच फायदा होणार आहे.

भारताला हा सामना वाचवायचा असेल तर त्यांना इतिहास घडवावा लागेल. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे जो पहिल्या डावात 50 किंवा त्याहून कमी धावसंख्येवर सर्वबाद झाल्यानंतर सामना वाचवण्यात यशस्वी ठरला आहे. पण, हे 122 वर्षांपूर्वी घडले. ऑस्ट्रेलियाने 1902 मध्ये इंग्लंडविरुद्धचा सामना 36 धावांत आटोपल्यानंतर शेवटी अनिर्णित केला होता.

बंगळुरू कसोटीतही भारताने इतिहास रचण्याच्या दिशेने जोरदार पावले उचलली आहेत. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला चार विकेट्स घेतल्यानंतर टीम साऊदी आणि रचिन रवींद्र यांच्या शतकी भागीदारीने भारताला जोरदार फटका बसला होता.  ज्यामुळे टीम इंडिया सामन्यातून खूप बॅकफूटवर गेली होती.

मात्र दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज बदललेल्या शैलीने फलंदाजी करताना दिसले. कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकाने टोन सेट करण्याचे काम केले. तर युवा सर्फराज खानच्या काउंटर अटॅकने किवी संघाला बॅकफूटवर ढकलले. चौथ्या दिवशी सर्फराजला स्वतः आक्रमक क्रिकेट खेळणाऱ्या पंतची साथ मिळाली. या दोघांनी मिळून किवी संघाला डोक्याला हात लावण्यास भाग पाडले आहे. पाऊस आणि भारतीय फलंदाजांच्या इराद्याने या सामन्यात आता जीव आले आहे. तर आता भारतीय संघ सामना जिंकला तर त्यात फारसं आश्चर्य वाटणार नाही.

हेही वाचा-

ind vs nz; सर्फराज खानचे मेडन शतक, टीम इंडिया 300 पार…
पाकिस्तान संघाला मिळाला नवा कर्णधार! हा खेळाडू घेणार बाबर आझमची जागा
ऋतुराज गायकवाड होणार कर्णधार! ईशान किशनचेही नशीब चमकणार; AUS दौऱ्याबाबत मोठे अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---