आयपीएल 2020 च्या ‘प्ले ऑफ’ ला गुरुवारपासून(5 नोव्हेंबर) सुरुवात होत आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात गुरुवारी अंतिम सामन्याच्या तिकिटासाठी लढाई रंगणार आहे. मुंबईचा दुखापतीतुन सावरलेला कर्णधार रोहित शर्मा कोणती रणनिती राबवतोय हे प्रत्यक्ष सामन्यातच दिसणार आहे. परंतु, रोहितने त्याचे सलामीचे स्थान सोडावे असे आता आकडेच सांगत आहेत.
मुंबई आणि दिल्ली संघांमध्ये होणारा सामना हा दोन्ही संघांसाठी सुरक्षित असा सामना आहे. कारण जिंकणारा संघ थेट अंतिम सामन्यात तर पराभूत संघाला अंतिम सामना गाठण्याची दुसरी संधी मिळेल. म्हणजेच पराभूत संघ ‘क्वालिफायर 2’मध्ये खेळणार आहे. असे असले तरी दोन्ही संघ थेट अंतिम सामन्यात जाणे पसंद करतील.
रोहित शर्मा सोडणार का सलामी ?
रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबईला आतापर्यंत एक चांगला संघ बनविले आहे. मागील काही सामने दुखापतीमुळे बाहेर असताना पोलार्डने ही संघाला कुठेही कमी पडू दिले नव्हते. रोहितने दुखापतीतुन पुनरागमन केले असले तरी त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. त्याने 10 सामन्यांत 26.40 च्या सरासरीने 264 धावा केल्या आहेत. त्यामुळे मुंबईला चांगली सुरुवात हवी असेल तर रोहितने पुढील सामन्यांत सलामीचे स्थान सोडणे संघासाठी फायद्याचेही ठरू शकते.
ईशान किशनलाच द्यावी सलामीची संधी
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ईशान किशनने मुंबई साठी सलामीला फलंदाजी केली होती. डी कॉक समवेत धावा जोडण्यासाठी तो यशस्वी देखील ठरला. त्याने नाबाद 68, 37, 25 आणि नाबाद 72 धावांची विस्फोटक खेळी केली. किशनने 11 डावांमध्ये आतापर्यंत 428 धावा केल्या आहेत. ज्यात सर्वाधिक 26 षटकारांचा देखील समावेश आहे. या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे की ईशान किशनला सलामीला उतरवणे हे मुंबईच्या संघासाठी नक्कीच फायद्याचे ठरू शकते. याशिवाय कर्णधार रोहित शर्माने पुढील सामने हे 4 थ्या क्रमांकावर येऊन खेळावे. आता असं होणार आहे का ? हेच आता पहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रोहितची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी घेण्यात गैर नाही”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत
संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा
आयपीएल २०२०: मुंबई-दिल्ली येणार आमने-सामने ; कुणाला मिळणार फायनलचं तिकीट?
ट्रेंडिंग लेख –






