रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्याच्या काळातील भारतीय क्रिकेट संघांचे दिग्गज फलंदाज आहेत. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक खेळत आहे. त्यातच बीसीसीआयने सोमवारी (31 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी संघ जाहीर केला. यामध्ये विराट-रोहित या दोघांनाही न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी आराम देण्यात आला. यामुळे एकाच चर्चेला उधान आले आहे की, विराट आणि रोहित 2024चा टी20 विश्वचषक खेळणार का? त्याचे स्पष्टीकरण संघनिवड अधिकाऱ्यांनी दिले आहे.
न्यूझीलंडच्या विरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका 18 नोव्हेंबरपासून खेळली जाणार आहे. या दौऱ्यात भारताच्या कर्णधारपदाची धुरा हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे आहे. त्यानंतर भारत शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या दोन्हीमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांची निवड केली गेली नाही. त्याचे कारण सांगताना मुख्य संघनिवड अधिकारी चेतन शर्मा यांनी वर्कलोडच्या कारणास्तव असे केले गेले असे म्हटले आहे. 2024चा टी20 विश्वचषक अमेरिकेत खेळला जाणार आहे.
रोहित सध्या 35 आणि विराट 33 वर्षाचा आहे. या दोघांबाबत प्रश्न विचारले असता चेतन शर्मा उत्तरले, “स्पर्धा सुरू असताना आपण त्या व्यक्तिबाबत कसे काय विचारू शकता. मी तर स्पर्धा सुरू असताना कोणाच्याही भविष्यातील गोष्टीविषयी बोलणार नाही. त्यांना काही वाटत असेल तर ते स्वत: आमच्याशी बोलतील.”
“युवा खेळाडूंनी त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. त्यांना विराट-रोहित सोबत ट्रेनिंग करण्याची संधी मिळते. जेव्हा तुम्ही प्रोफेशल क्रिकेटर्स असता तेव्हा तुमचे वयही महत्वाचे असते, किंवा तुम्ही उत्तम कामगिरी करत असाल तर तुमची संघात नक्कीच निवड होते,” असेही शर्मा पुढे म्हणाले.
टी20 विश्वचषकाच्या आठव्या हंगामात भारताने 3 पैकी 2 सामने जिंकले. त्यातील चौथा सामना 2 नोव्हेंबरला बांगलादेशविरुद्ध आहे. विराटने या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध नाबाद 82 धांवाची खेळी करत सामना जिंकून देण्यात महत्वाची भुमिका पार पाडली. तसेच दोघांनी नेदरलॅंड्स विरुद्ध अर्धशतकी खेळीही केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचे असे ६ खेळाडू ज्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात टी२० विश्वचषकातून झाली
VIDEO: बेबी एबीची कमाल! 57 चेंडूत ठोकल्या 162 धावा