भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सामन्यासाठी सराव करून खूप मेहनत केली आहे. भारतीय संघाचा आज दुबईमध्ये न्युझीलंडविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी मधील अंतिम सामना होणार आहे. एका रिपोर्टनुसार सामन्याच्या आधी विराट कोहलीला दुखापत झाली आहे. विराट कोहलीला सराव करताना गुडघ्याला दुखापत झाली आहे. विराट कोहलीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार अस प्रदर्शन केल आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरी सामन्यात शानदार अशी पारी खेळली होती.
कोहली भारतीय संघासोबत सराव करत असताना त्याला दुखापत झाली होती. जिओ न्यूजच्या माहितीनुसार विराटच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने सराव सेशन मध्येच सोडले होते. रिपोर्टनुसार टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफने सांगितले की, विराटची दुखापत जास्त गंभीर नाही, त्यामुळे भारतीय संघाला चिंता करण्याची आवश्यकता नाही.
विराटची दुखापत जास्त गंभीर नाही. यामुळे न्यूझीलंड विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना तो खेळू शकतो. तसेच बीसीसीआयने या गोष्टीवर अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. भारतासाठी सर्वात जास्त धावा करणारा विराट कोहली टॉपच्या स्थानी आहे. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकले आहे. तसेच विराट आज कशी कामगिरी करतो त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघाने न्यूझीलंडचा साखळी सामन्यात दारुण पराभव केला होता. हा सामना दुबईच्या मैदानावर खेळण्यात आला होता. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 249 धावा केल्या होत्या. यादरम्यान श्रेयस अय्यरने 79 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 205 धावांवर बाद झाला. भारतासाठी वरूण चक्रवर्तीने घातकी गोलंदाजी केली होती. त्याने संपूर्ण सामन्यात 5 विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा
भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो न्युझीलंंडचा हा खेळाडू , भारताशी आहे जुन नातं
रोहितने 2027 वर्ल्ड कप पर्यंत का खेळायला हवं? जाणून घ्या कारण एका क्लिकवर
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी संघ सज्ज, न्यूझीलंडला मोठा धक्का बसणार?






