अहमदाबादमध्ये जेव्हा भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) ‘सुपर-8’ च्या सामन्यात आमने-सामने येतील, तेव्हा सर्वांच्या नजरा अभिषेक शर्मावर (Abhishek Sharma) असतील. जेव्हा एखादा फलंदाज त्याच्या टी20 वर्ल्ड कप करिअरच्या पहिल्या तिन्ही डावात ‘शून्य’ धावांवर बाद होतो, तेव्हा त्याच्यावर दबाव येणे स्वाभाविक आहे. याच दबावाच्या पार्श्वभूमीवर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी अभिषेक शर्माने त्याचा मार्गदर्शक (मेंटॉर) युवराज सिंगची (Abhishek Sharma meet his mentor Yuvraj Singh) भेट घेतली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, त्यात असा दावा केला जात आहे की युवराज सिंग काल रात्री अहमदाबादमध्ये उपस्थित होता. या व्हिडिओमध्ये अभिषेक शर्मा एका गाडीतून उतरताना दिसत असून, युवराजला भेटल्यानंतर तो पुन्हा टीम हॉटेलमध्ये परतल्याचे सांगितले जात आहे.
🚨 Last night, Abhishek Sharma met Yuvraj Singh in Ahmedabad.
— Sonu (@Cricket_live247) February 22, 2026
Abhishek was later seen returning to the team hotel after the meeting.
Yuvraj must have guided and motivated him for today’s big match against South Africa.
Abhishek’s performance in the Super 8 is very important.… pic.twitter.com/AjxJC0Apxn
अभिषेक शर्मासाठी हा वर्ल्ड कप आतापर्यंत अत्यंत कठीण ठरला आहे. यूएसए विरुद्ध तब्येत ठीक नसतानाही अभिषेक फलंदाजीला आला, पण खाते न उघडताच बाद झाला. तर, नामिबिया विरुद्ध आजारपणामुळे त्याला हा सामना खेळावा लागला नाही. पाकिस्तान विरुद्ध 15 फेब्रुवारीला पुनरागमन केले, पण तिथेही त्याची बॅट शांत राहिली. तसेच नेदरलँड विरुद्ध येथेही अभिषेकला निराशाच हाती लागली. अशा खराब फॉर्ममुळे अभिषेकला ‘प्लेइंग इलेव्हन’ मधून बाहेर काढले जाईल आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळेल, अशी चर्चा सुरू झाली होती.
अभिषेकच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav on Abhishek Sharma) चोख प्रत्युत्तर दिले आहे. सूर्या म्हणाला, लोक अभिषेकच्या फॉर्मबद्दल इतके काळजीत का आहेत? मी तर त्या संघांचा विचार करतोय ज्यांना अभिषेकचा सामना करायचा आहे. त्याने अजून धावा केल्या नसतील, पण जेव्हा तो धावा करायला सुरुवात करतो तेव्हा काय होते, हे तुम्हा सर्वांना ठाऊक आहे.





