---Advertisement---

विस्डेनने इंग्लंडविरुद्धच्या विश्व एकादशची केली घोषणा, भारतीय खेळाडूंचे संघात वर्चस्व

On: गुरूवार, मे 27, 2021 4:20 PM
Virat Kohli and Rohit Sharma
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंड व न्यूझीलंड कसोटी मालिकेत भिडतील. त्यानंतर भारत व न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ ते २२ जून या कालावधीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना एजबॅस्टन येथे खेळवला जाईल. भारतीय संघ ऑगस्ट महिन्यापासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची ‘हाय प्रोफाईल’ कसोटी मालिका खेळेल.

इंग्लंडमध्ये इतके क्रिकेट खेळले जाणार असल्याने, विस्डेनने इंग्लंडला वनडे क्रिकेटमध्ये टक्कर देऊ शकणाऱ्या विश्व एकादशची (विस्डेन रेस्ट ऑफ द वर्ल्ड वनडे इलेव्हन) घोषणा केली. या संघाचे नेतृत्व भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याकडे देण्यात आले असून, त्या व्यतिरिक्त आणखी चार भारतीयांचा या संघात समावेश आहे.

विस्डेनची ‘विश्व एकादश’
विस्डेनने नुकतीच इंग्लंडला इंग्लंडमध्ये वनडे सामन्यात टक्कर देऊ शकणाऱ्या सध्याच्या विश्व एकादशची घोषणा केली. या संघामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व राहिले. संघाची धुरा भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या हाती देण्यात आली असून अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा, स्टायलिश फलंदाज केएल राहुल, अष्टपैलू रवींद्र जडेजा व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे इतर भारतीय संघात आहेत.

संघात यष्टीरक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकची निवड झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम व युवा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदी यांना देखील संघात स्थान देण्यात आले. तडाखेबंद फलंदाज व अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हे या संघात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करतील. फिरकीची जबाबदारी अफगाणिस्तानच्या राशिद खानच्या खांद्यावर असेल.

विस्डेन रेस्ट ऑफ द वर्ल्ड वनडे इलेव्हन-
रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), बाबर आझम, ग्लेन मॅक्सवेल, केएल राहुल, रवींद्र जडेजा, राशिद खान, मिचेल स्टार्क, शाहीन आफ्रिदी, जसप्रीत बुमराह.

महत्वाच्या बातम्या-

बांग्लादेशची गरुडभरारी! भारतासह दिग्गज संघांना पछाडत या क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान

रमेश पोवार यांच्यासोबतच्या वादाविषयी मितालीचे मोठे भाष्य, म्हणाली

WTC फायनलमध्ये एका सामन्याऐवजी तीन सामने पाहिजे होते; विश्वविजेत्या भारतीय कर्णधाराचे परखड मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---