भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे सामना रविवारी (9 ऑक्टोबर) रांचीमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताला विजयासाठी 279 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने शानदार फलंदाजी करत शतक झळकावून भारताच्या भारताला विजयाच्या जवळ नेले. हे त्याच्या कारकिर्दीतील दुसरे वनडे शतक ठरले.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयसने अप्रतिम खेळाचा नजराणा सादर केला. कोणतीही जोखीम न पत्करता त्याने एकेरी दुहेरी धावांसह खराब चेंडूंचा समाचार घेतला. संघाला विजयीरेषेच्या पार नेत त्याने 111 चेंडूवर 113 धावांची खेळी केली. यामध्ये 15 चौकारांचा समावेश होता.
श्रेयस केवळ याच सामन्यात नव्हेतर मागील सहा सामन्यांपासून शानदार फॉर्ममध्ये आहे. या सामन्यासह मागील सहा सामन्यांमध्ये त्याने चार अर्धशतके व एक शतक झळकावले असून, एक 44 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली होती. यापैकी पहिले अर्धशतक त्याच्या बॅटमधून अहमदाबादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आले होते. या सामन्यात त्याने 80 धावा केलेल्या. त्यानंतर वेस्ट इंडीज विरुद्धच 54, 63 व 44 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध मागील सामन्यात देखील त्याची बॅट तळपलेली. या सामन्यात त्याने 50 धावांची खेळी केलेली. त्यानंतर आता त्याने शतक झळकावले आहे.
श्रेयस शानदार फॉर्ममध्ये असला तरी त्याची पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाली नाही. परंतु तो राखीव खेळाडूंमध्ये सहभागी आहे. एखादा खेळाडू जखमी झाल्यास त्याच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. श्रेयसचा सध्याचा फॉर्म पाहता एखाद्या फलंदाजाच्या जागी त्याचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
श्रेयस-इशानच्या तुफानाने मालिका बरोबरीत! रांची वनडेत टीम इंडिया वरचढ
रांचीचा नवा राजकुमार! घरच्या मैदानावर इशान किशनचा धमाका; वादळी खेळीने मिळवली वाहवा