इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना बुधवारपासून (२५ ऑगस्ट) सुरू झाला आहे. लॉर्ड्सवरील सामना गमावल्यानंतर इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार पुनरागमन केले आहे. इंग्लंडच्या दोन्ही विभागातील खेळाडूंनी भारतीय संघाची दमछाक करून सोडली. भारताच्या ७८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने चांगली सुरुवात केली. मात्र यादरम्यान भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला. जडेजाने इंग्लंडचा सलामीचा फलंदाज हसीब हमीदला त्रिफळाचीत करत या विक्रमाला गवसणी घातली.
जडेजाने हसीब हमीदची विकेट घेत भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगचा विक्रम मोडीत काढला आहे. यासह जडेजा इंग्लंडविरुद्ध सर्वात जास्त विकेट घेणाऱ्यांच्या यादीत ८ व्या स्थानावर पोहोचला. जडेजाने हरभजन सिंगचा ४५ विकेट्सचा विक्रम मोडला. याआधी हरभजनने १४ कसोटी सामन्यात ४५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर आता जडेजाने १४ कसोटी सामन्यांमध्ये ४६ विकेट्स घेत हा विक्रम आपल्या नावे केला.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक कसोटी क्रिकेटमध्ये विकेट घेण्याचा विक्रम भागवत चंद्रशेखर यांच्या नावावर आहे. त्यांनी २३ कसोटी सामन्यात तब्बल ९५ विकेट घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ भारताचा माजी फिरकीपटू गोलंदाज अनिल कुंबळे ९२ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर ८८ विकेटसह आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोहलीचा हा निर्णय चुकल्याचा लवकर स्पष्ट झाले. इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर चांगलेच वर्चस्व गाजवले. ज्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघाने केवळ ७८ धावा केल्या.
याच्या उत्तरादाखल मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाने तिसऱ्या सत्रापर्यंत इंग्लंडने ३७८ धावा केल्या. ज्यामुळे इंग्लंडचा संघ सध्या ३०० धावांनी आघाडीवर आहे. ज्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट ११६ धावांवर नाबाद खेळत आहे. तर त्याच्या सोबतीला मोईन अली देखील मैदानात आहे. तर भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीला ३ व मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी १-१ विकेट्स मिळाल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
–जो रूट एक्सप्रेस सुस्साट! इंग्लंडच्या कर्णधाराचे तुफानी शतक; मोडला मियाँदादचा रेकॉर्ड
–शमीचा दणका, बर्न्सच्या विकेटसह ‘या’ विक्रमाला गवसणी; खूप कमी भारतीयांनी केलीय ही किमया
–संधीचं सोनं! तीन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करत मलानचे झुंजार अर्धशतक, त्याचा आनंद तर पाहा