वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील पहिल्या वनडे सामन्याला पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरुवात झाली. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाचा उपकर्णधार रवींद्र जडेजा पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने पहिल्या दोन कसोटीमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर दिली गेली आहे.
West Indies have won the toss and they will bowl first in the 1st ODI against #TeamIndia
Live – https://t.co/tE4PtTfY9d #WIvIND pic.twitter.com/g0iXOX9Uki
— BCCI (@BCCI) July 22, 2022
या सामन्यात कर्णधार शिखर धवनसह शुबमन गिल सलामीला येईल. मध्य फळीची जबाबदारी श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव व दीपक हुडा सांभाळतील. अक्षर पटेल व शार्दुल ठाकूर यांना अष्टपैलू म्हणून संघात जागा मिळाली आहे. युजवेंद्र चहल संघातील एकमेव फिरकीपटू असेल. तर, प्रसिद्ध कृष्णा व मोहम्मद सिराज वेगवान मारा सांभाळतील. या मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून नियुक्त केला गेलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा पहिल्या दोन सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
A look at our Playing XI for the 1st ODI.
Live – https://t.co/tE4PtTfY9d #WIvIND pic.twitter.com/WuwCljou75
— BCCI (@BCCI) July 22, 2022
पहिल्या सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन-
भारत- शिखर धवन(कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, दीपक हुडा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा.
वेस्ट इंडिज- शाई होप, ब्रॅंडन किंग, शमारह ब्रूक्स, काइल मेयर्स, निकोलस पूरन (कर्णधार), रोवमन पॉवेल, अकील होसेन, रोमारियो शेफर्ड, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, जयडेन सील्स
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचे ८६.२१ कोटी देण्यास बायजूसचा नकार?, पेटीएमही सोडणार स्पॉन्सरशिप, वाचा संपूर्ण प्रकरण
INDvWI: ‘गुरु’ द्रविड यांचा मास्टर स्ट्रोक! नेटमध्ये चक्क लोकल गोलंदाजाकडून करून घेतली गोलंदाजी