Harry Brook IPL 2024: आयपीएल 2024 लिलाव अवघ्या 2 दिवसांवर आला आहे. मात्र, त्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघाने मागील हंगामात खराब प्रदर्शन करणारा इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक याला रिलीज केले होते. संघापासून वेगळा झाल्यानंतर ब्रूकचे मैदानावर वेगळेच रूप पाहायला मिळत आहे. तो सातत्याने मैदानात शानदार प्रदर्शन करत हैदराबादला त्यांचा निर्णय चुकल्याची जाणीव करून देत आहे.
शनिवारी (दि. 16 डिसेंबर) ग्रेनाडाच्या नॅशनल क्रिकेट स्टेडिअम येथे वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड (West Indies vs England) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना पार पडला. हा सामना इंग्लंडने 7 विकेट्स राखून नावावर केला. तसेच, मालिकेत 1-2ने पुनरागमन केले. या सामन्यात इंग्लंडकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अवघ्या हॅरी ब्रूक (Harry Brook) याने 7 चेंडूत वादळी फलंदाजी करत संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या चेंडूंचा सामना करताना हॅरी ब्रूकने 442.85च्या स्ट्राईक रेटने (Harry Brook 442.85 Strike Rate) नाबाद 31 धावा चोपण्यात यशस्वी झाला. यावेळी त्याच्या बॅटमधून 1 चौकार आणि 4 शानदार षटकार निघाले.
Harry Brook chased down 21 in the last over to take England to a memorable victory…!!!pic.twitter.com/ZV7w5fHjlI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 17, 2023
ब्रूकच्या या विस्फोटक खेळीमुळे इंग्लंड संघ तिसऱ्या टी20 सामन्यात एक चेंडू राखून 7 विकेट्सने विजय मिळवू शकला. त्याच्याव्यतिरिक्त डावाची सुरुवात करताना फिल सॉल्ट हादेखील चमकला. त्याने संघासाठी 56 चेंडूत 194.64च्या स्ट्राईक रेटने नाबाद 109 धावा केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 9 षटकारही मारले.
तिसऱ्या टी20 सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 222 धावा केल्या होत्या. संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या निकोलस पूरन याने 45 चेंडूत 82 धावांची सर्वोच्च खेळी केली होती.
वेस्ट इंडिजकडून मिळालेले 223 धावांचे आव्हान इंग्लंडने 19.5 षटकात 3 विकेट्स गमावत यशस्वीरीत्या पार केले. संघासाठी फिल सॉल्ट (नाबाद 109) याने शतक झळकावले, तर कर्णधार बटलरने 34 चेंडूत 51 धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त मधल्या फळीतील फलंदाज ब्रूकने संघाला आव्हान गाठून दिले. (WIvsENG Batter harry brook srh sunrisers hyderabad ipl auction 2024 west indies vs england 3rd t20i)
हेही वाचा-
रोहित मुंबई इंडियन्सची साथ सोडून आयपीएल 2024च्या लिलावात सामील होणार? वाचा सविस्तर
राजकोटमध्ये घडला इतिहास! हरियाणा पहिल्यांदाज विजय हजारे ट्रॉफीचा मानकरी, राजस्थानला चारली पराभवाची धूळ