---Advertisement---

विश्वचषकातील ‘बाप’ सामन्यासाठी या क्रिकेटरचे आई-वडिल ऑस्ट्रेलियात

On: शनिवार, मार्च 7, 2020 6:06 PM
---Advertisement---

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर उद्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात भारतीय संघाच नेतृत्त्व हरमनप्रीत कौर करत आहे.

विशेष म्हणजे ती उद्या अर्थात ८ मार्च रोजी आपला ३१वा वाढदिवस साजरा करत असून उद्या महिला दिन देखील आहे.

अशाप्रकारे हा त्रिवेणी संगम जोडून आलेला असताना हरमनप्रीतचे आई-वडिल भारतातून थेट ऑस्ट्रेलियाला आपल्या लाडक्या मुलीचा खेळ पाहण्यासाठी गेले आहेत. ते भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनलसाठी देखील सिडनी येथे स्टेडियमवर गेले होते. परंतु पावसामुळे हा सामना होऊ शकला नव्हता.

यामुळे हरमनप्रीतसाठी उद्याचा सामना हा अनेक अर्थांनी महत्त्वपुर्ण ठरणार आहे.  उद्या हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार १.३० वाजता सुरु होणार आहे.

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---