भारतीय क्रिकेट नियामक मंडळने (बीसीसीआय) पुढील महिन्यात आयोजल्या जाणाऱ्या महिला आयपीएल म्हणजेच महिला टी२० चॅलेंज स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची अद्याप घोषणा केलेली नाही. पण आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावरील भारतीय महिला खेळाडूंना त्यांच्या निवडीसाठी सूचित करण्यात आले आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामादरम्यान महिला टी२० चॅलेंजचे आयोजनही संयुक्त अरब अमिरातीमध्ये केले जाणार आहे. यात तीन संघ खेळतील.
या स्पर्धेसाठी जवळपास ३० भारतीय महिला खेळाडूंना १३ ऑक्टोबरला मुंबई येथे पोहोचण्यास सांगितले आहे. मात्र क्वारंटाइनच्या बंधनामुळे तिन्ही संघांच्या पुर्व तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
देशाच्या वेगवेगळ्या भागातून मुंबईला पोहोचल्यानंतर खेळाडूंना एका आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. दरम्यान त्यांच्या अनेक कोरोना चाचण्या होणार आहेत. त्यानंतर २२ ऑक्टोबरला सर्व खेळाडू युएईला जाण्यासाठी रवाना होतील. त्यानंतर तिथेही ६ दिवसांसाठी त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तिथे सर्व खेळाडूंची आरटी पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितले की, “सर्व महिला खेळाडूंना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांचा वॉट्सअप ग्रुपदेखील बनवला आहे. १९ वर्षांखालील क्रिकेट संघातील काही खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना खूप अनुभव मिळेल. तसेच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या मितली राज आमि झूलन गोस्वामीही या स्पर्धेत खेळतील.”
महिला टी२० चॅलेंजचे सर्व चार सामने शारजाहच्या मैदानावर होण्याची शक्यता आहे. गेल्या ६ महिन्यांपासून या खेळाडूंनी क्रिकेट खेळलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
चेतेश्वर पुजाराच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला १० वर्षे पूर्ण, चाहत्यांचे मानले ‘असे’ आभार
“१० कोटी नाही तर त्याची किंमत…”, माजी भारतीय क्रिकेटरने साधला मॅक्सवेलवर निशाना
श्रेयस अय्यरसाठी रिषभ पंत ठरतोय अनलकी बॅटिंग पार्टनर, जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: राजस्थान विरुद्ध दिल्ली सामन्यात स्मिथ, अय्यरसह ‘हे’ ५ खेळाडू करु शकतात खास विक्रम
हैदराबादने एकहाती जिंकला सामना; जाणून घ्या पंजाबच्या पराभवाची ५ कारणे
किस्से क्रिकेटचे – मैदानावर हत्ती आला आणि भारतीय संघाने इंग्लंडमध्ये विजयाचा श्रीगणेशा केला