टोकियो। ऑलिंपिक २०२० मध्ये गुरुवारी (२९ जुलै) महिलांच्या नौकानयनाच्या लेजर रेडियल स्पर्धेतील ७ वी आणि ८ वी शर्यत पार पडली. ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय महिला नौकानयनपटू नेत्रा कुमारनने ८ व्या शर्यतीत ७ व्या शर्यतीपेक्षाही चांगले स्थान पटकावले आहे.
नेत्रा ७ व्या शर्यतीत २२ व्या क्रमांकावर राहिली. यामुळे ती महिलांच्या रेडियल स्पर्धेत एकूण ३२ व्या स्थानावर पोहोचली. यानंतर ८ व्या पात्रता शर्यतीत तिने २० वा क्रमांक पटकावला आणि ती एकूण ३१ व्या क्रमांकावर आहे. (Women’s Laser Radial Race 7-8 Results Nethra finished 22nd and 20th in Race 7 and 8 to be placed 31st overall)
#TeamIndia | #Tokyo2020 | #Sailing
Women's Laser Radial Race 7-8 ResultsNethra finished 22nd and 20th in Race 7 and 8 to be placed 31st overall. Spirited sailing action by @nettienetty in her debut #Olympics #WayToGo champ👏🙌🇮🇳 #RukengeNahi #EkIndiaTeamIndia #Cheer4India pic.twitter.com/QsGZfQNr0g
— Team India (@WeAreTeamIndia) July 29, 2021
तिची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ही १५ आहे, जी तिने तिसऱ्या शर्यतीमध्ये मिळवली होती. आता ९ आणि १० वी शर्यत शुक्रवारी (३० जुलै) होणार आहे. १० व्या शर्यतींनंतर अव्वल १० स्पर्धक पदकाच्या शर्यतीत जागा मिळवतील.
पुरुषांच्या नौकानयन स्पर्धा
पुरुषांच्या नौकानयन ४९ एर स्पर्धेतील ५ व्या शर्यतीत वरुण ठक्कर आणि केसी गणपती या भारतीय जोडीने १६ वा क्रमांक पटकावला. तसेच स्पर्धेत त्यांनी एकूण १८वा क्रमांक मिळवला.
यानंतर झालेल्या नौकानयन ४९ एर स्पर्धेतील ६ व्या शर्यतीत ही भारतीय जोडी ५ व्या क्रमांकावर राहिली, तर एकूण स्पर्धेत ते १७ व्या स्थानी होते.
विष्णू सर्वनन २७ व्या स्थानी
याव्यतिरिक्त विष्णू सर्वनन पुरुषांच्या नौकानयन लेजर स्पर्धेतच्या ७ व्या शर्यतीत २७ वे स्थान मिळवले. तो या स्पर्धेत एकूण २२ व्या स्थानी होता.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना