भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा थरार चालू आहे. दुसरीकडे कोविड-१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेनेही देशभरात थैमान घातले आहे. याचा परिणाम बंद दाराआड होत असलेल्या आयपीएलवर होतोना दिसत आहे. अशात आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांदरम्यान होणाऱ्या महिला टी२० चॅलेंज अर्थात महिला आयपीएलला कोरोनाचा फटका बसला आहे.
भारतातील कोरोनाचा वाडता प्रकोप पाहता आणि ऑस्ट्रेलियासह इतर देशांनी प्रवासावर घातलेले निर्बंध पाहता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ महिला आयपीएलचा चौथा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र अद्याप याबाबत कसलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
ईएसपीएन क्रिकइंफोमधील वृत्तानुसार, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या देशाच्या महिला क्रिकेटपटूंना कोरोनाच्या परिस्थितीत भारतात बोलवणे, हे बीसीसीआयपुढील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. गतवर्षी एकूण १२ परदेशी महिला क्रिकेटपटू महिला आयपीएलमध्ये सहभागी झाल्या होत्या. यात डियान्ड्रा डॉटिन, सन लुउस, डॅनिएल वॉट आणि नाथकन चांथम अशा परदेशी महिला क्रिकेटपटूंचा समावेश होता.
गतवर्षीप्रमाणे आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील प्लेऑफ सामन्यांच्या दरम्यान महिलांच्या टी-२० चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्याचे बीसीसीआयची योजना होती. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर हे सामने होण्याची शक्यता होती. परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा सुरू होण्यापुर्वीच संकटात अकडकल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो’ निर्णय घेत रिषभ बचावला अन् कोहलीच्या चेहऱ्याचा रंग उडाला, बघा नक्की काय किस्सा घडला
बेंगलोर-दिल्ली सामन्यात दर्शकांना घडलं सचिनचं दर्शन! पृथ्वी शॉच्या ‘त्या’ कृत्याने रंगली एकच चर्चा