यंदाच्या महिला टी20 विश्वचषकच्या अंतिम फेरीतील दोन्ही संघांची नावे समोर आली आहेत. ऑस्ट्रेलियाला पराभूत करून आधीच अंतिम फेरीत पोहोचलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा उद्या म्हणजेच 20 ऑक्टोबरला दोन वेळा अंतिम फेरीत आलेल्या न्यूझीलंडशी सामना होणार आहे. न्यूझीलंडने 2016 च्या विश्वविजेत्या वेस्ट इंडिजचा उपांत्य फेरीच्या सामन्यात 8 धावांनी पराभव करून अंतिम फेरीचे तिकीट बुक केले. 2010 नंतर प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यात न्यूझीलंड संघाला यश आले आहे. आता यावेळी जगाला एक नवीन टी20 विश्वचषक चॅम्पियन संघ मिळणार आहे. कारण हे दोन्ही संघ अद्याप विजेतेपद जिंकलेले नाहीत.
फिरकीपटू एडन कार्सन आणि अमेलिया केर यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर न्यूझीलंडने कमी धावसंख्येच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आतापर्यंत 2009 आणि 2010 मध्ये उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंडचा संघ रविवारी अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार आहे. तर पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
Two worthy finalists 🔥
Who takes home the #T20WorldCup 2024 trophy? 🏆
More ➡️ https://t.co/0PfpOQ3SKE pic.twitter.com/2aWDBSakpn
— ICC (@ICC) October 19, 2024
टाॅस जिंकून पहिल्या डावात फलंदाजी करताना न्यूझीलंडला 9 विकेट्सवर केवळ 128 धावा करता आल्या. ज्यामध्ये डिआंड्रा डॉटिनने 22 चेंडूत 33 धावांचे योगदान दिले. तर धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून 120 धावाच करू शकला. ऑफस्पिनर कार्सनने 29 धावांत तीन बळी घेतले. तर केरने चार षटकांत 14 धावांत दोन बळी घेतले.
या स्पर्धेत कार्सनने आठ तर केरने 12 विकेट्स घेतल्या आहेत. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये खेळलेल्या सुझी बेट्सने वेस्ट इंडिजला 15 धावांची गरज असताना शेवटचे षटक टाकले. बेट्सने केवळ सात धावा दिल्या. बेट्स, कर्णधार सोफी डिव्हाईन आणि ताहुहू यांच्यासाठी ही शेवटची टी20 स्पर्धा असू शकते. जी त्यांना विजयासह संस्मरणीय बनवायची आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजसाठी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या डॉटिनने शानदार गोलंदाजी करत 22 धावांत चार बळी घेतले.
हेही वाचा-
भारताला पाकिस्तानात निमंत्रित करण्यासाठी पीसीबीने वापरली नवी युक्ती! BCCI समोर ठेवली ही ऑफर
Ranaji Trophy; ईशानचे शतक तर सुदर्शनचे द्विशतक, टीम इंडियामध्ये कधी मिळणार स्थान?
विराट कोहलीची शेवटच्या चेंडूवर मोठी चूक, रिव्ह्यू घेऊनही ठरला बाद!