मिताली राज ही भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आहे. तिने एकाहून अधिक आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेत (2005 आणि 2017) भारताचे नेतृत्व केले. असा मान मिळवणारी ती एकमेव महिला खेळाडू आहे. अशात मितालीने 10 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेविषयी भारतीय महिला क्रिकेट संघाला एक खास सल्ला दिला आहे.
महिला टी20 विश्वचषक 2023 (Womens T20 World Cup 2023) 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. अलीकडेच, आयसीसीने 19 वर्षांखालील टी20 विश्वचषक आयोजित केला होता, ज्यामध्ये भारतीय महिला संघाने शानदार विजय मिळवला. आता वरिष्ठ भारतीय महिला संघाची नजर टी20 विश्वचषक जिंकण्याकडे आहे. गेल्या वेळी भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण ऑस्ट्रेलियन संघाकडून भारताला पराभव पत्करावा लागला. यंदाच्या विश्वचषकापूर्वी भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने भारतीय संघाला मोलाचा दिला आहे.
आयसीसी एका लेखात मितालीने सांगितले की, “स्म्रीती मंधाना मॅचविनर आहे. तसेच, कर्णधार हरमनप्रीत कौर उत्कृष्ट फॉर्ममध्ये खेळत आहे. भारतीय संघ वरच्या फळीत खेळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. स्म्रीती आणि हरमन चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत, पण तुम्हाला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघाला हरवायचे आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी इतर फलंदाजांची गरज असेल. मला आशा आहे की, शफाली वर्मा आणि ऋचा घोष या दोघी टी20 विश्वचषक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतील. कारण, त्यांना दक्षिण आफ्रिकेच्या परिस्थितीत खेळण्याचा चांगला अनुभव आहे.”
मिताली पुढे म्हणाली, “भारतीय संंघाला गोलंदाजीत सुधारणा करावी लागेल. काही युवा खेळाडूही खेळणार आहेत. ज्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला आशा आहे की, डब्ल्यूपीएल (Women’s Premier League) खेळाडूंच्या विकासासाठी खूप मदत करेल. 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत जगभरात किती युवा प्रतिभा खेळाडू आहेत हे आपण पाहिले.”
टी20 विश्वचषकात भारतीय संघ 12 फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज, 18 फेब्रुवारी रोजी इंग्लंड आणि शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. या सर्व सामन्यांचे निकाल विश्वचषकात भारतीय संघाचे भवितव्य ठरवतील. (Women’s T20 World Cup Former captain of the Indian women’s team Mithali Raj Advice to India team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बापरे, एवढा विश्वास! श्रीलंकन दिग्गज म्हणतोय, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीत ‘हा’ संघ 2-1ने गुंडाळेल मालिका
Womens T20 World Cup: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा 44 धावांनी पराभव, स्म्रीती अन् जेमिमाह शून्यावर आऊट