न्यूझीलंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकात रविवारी (६ मार्च) भारत आणि पाकिस्तान महिला संघ आमने-सामने आले. या सामन्यात भारताने १०७ धावांनी सोपा विजय मिळवला. भारतीय संघाची अष्टपैलू पूजा पस्त्राकर ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरली. पण या सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष (Richa Ghosh) चर्चेचा विषय बनली. सामन्यात ऋचाने एक अप्रतिम झेलही घेतला, ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
तसे पाहिले तर भारतीय संघाने सामन्यात पाकिस्तानच्या तुलनेत खूप चांगले प्रदर्शन केले आणि परिणामी संघाला विजयही मिळाला. पण यष्टीरक्षक फलंदा ऋचा घोषणे घेतले झेल पाहून प्रत्येकजण हैराण आहे. हा झेल ऋचाने डावाच्या ३७ व्या षटकात घेतला, जेव्हा भारतीय संघ विजयापासून थोड्याच अंतरावर होता. या षटकात भारतीय गोलंदाज स्नेह राणा गोलंदाजी करत होती आणि पाकिस्तान संघाची फलंदाज नशरा संधू स्ट्राइकवर होती.
संधूने स्नेह राणाच्या ३७ व्या षटकातील पाचवा चेंडू रकक्षात्मक खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो बॅटवर नीट बसला नाही आणि हवेत उडाला. चेंडू हवेत उडाल्यानंतर यष्टीपाठी उभी असेली ऋचा धावत पुढे आली आणि झेप घेऊन झेल घेतला. तिचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. चाहते त्यावर मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कमेंट्स करत आहेत. दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि पाकिस्तानपुढे २४५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघ अवघ्या १३७ धावांवर सर्वबाद झाला.
https://www.instagram.com/reel/CawQbduleF3/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, आयसीसीस महिला विश्वचषक २०२२ (ICC Women’s World Cup 2022) मधील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता. दोन्ही कट्टर विरोधी संघांनी एकमेकांविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात केली. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सुरुवात गोड केली आहे.
तसे पाहिले तरी, भारतीय महिला संघ नेहमीच पाकिस्तानी महिला संघावर भारी पडला आहे. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमध्ये ११ एकदिवसीय सामने खेळले गेले आणि त्यापैकी पाकिस्तानला एकही जिंकता आला नाही. भारताने सर्वच्या सर्व सामने जिंकले. सामना पहिल्यानंतर भारतीय संघ आणि पाकिस्तानी संघातील अंतर स्पष्टपणे जाणवले. पाकिस्तानी संघ भारतापेक्षा अनेक बाबतीत मागे आहे आणि त्यांना स्वतःच्या खेळावर काम करण्याची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएलच्या पहिल्या सामन्यावर सीएसकेची ‘सत्ता’; यावेळी केकेआरचे आव्हान
कसोटी कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहित सुपर-डुपर हिट, एका डावाने मॅच जिंकत केला मोठा रेकॉर्ड
आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी टीम इंडियाला मिळाला होता हिरा, ज्याने बदलला क्रिकेटचा चेहरामोहरा






