श्रीलंका क्रिकेट संघ विश्वचषक स्पर्धेतून जवळपास बाहेर पडला आहे. विश्वचषकाच्या गुणातिलेकत सध्या त्यांचा सातवा क्रमांक आहे. शेवटचा सामना श्रीलंकेने भारताविरुद्ध तब्बल 302 धावांनी गमावला. या सामन्यात अवघ्या 55 धावांवर सर्वबाद झालेल्या श्रीलंकेवर सर्वत्र टिका होत आहेत. अशातच क्रिकेट असोसिएशन ऑफ श्रीलंकामध्येही काही महत्वपूर्ण घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत.
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील विश्वचषक सामना गुरुवारी (2 नोव्हेंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्सच्या नुकसानावर 357 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तारत श्रीलंका संघ 19.4 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला. मोहम्मद शमीने 18 धावा खर्च करून सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. या अप्रतिम प्रदर्शनासाठी मोहम्मद शमीने सामनावीर पुरस्कार दिला गेला.
भारताविरुद्ध श्रीलकंन संघाच्या सुमार प्रदर्शनानंतर त्यांचे क्रीडा मंत्री रोशन रणसिंघे (Roshan Ranasinghe) यांनी नाराजी जाहीर केली. तसेच एसएससी म्हणजे क्रिकेट असोसिएशन ऑफ श्रीलंकेच्या एकत्रित राजनाम्याची मागणीही केली. त्यांना एका विधानात या पराभवासाठी निवडकर्ते आणि एसएलसी प्रशासनला जबाबदार ठरवले. याच पार्श्वभूमीवर एसएलसीचे सचिव मोहन डी सिल्वा (Mohan de Silva) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. शम्मी सिल्ला अध्यक्ष असणाऱ्या एसएलसी प्रशासनाने वानखेडेमध्ये झालेल्या पराभवानंतर सविस्तर अहवाल मागवला आहे. शम्मी सिल्वा हे एससीएलचे बिनविरोध अध्यक्ष आहेत. त्याचा वर्तमान कार्यकाळ 2025 पर्यंत आहे. यापूर्वी दोन दोन वेळा त्यांनी एसएलसीसाठी ही जबाबदारी पार पाडली आहे.
दरम्यान, विश्वचषकातील श्रीलंकेच्या एकंदरीत प्रदर्शनावर विचार केला, तर श्रीलंका संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे. मागच्या दोन सामन्यांमध्ये श्रीलंकेला भारत आणि अफगाणिस्तानविरुद्ध पराभव मिळाला आहे. त्याआधीच्या दोन सामन्यांमध्ये श्रीलंकेने इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्याविरुद्ध विजय मिळवला होता. तर सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव मिळाला आहे. आपला पुढचा सामना श्रीलंकन संघाला बांगालदेशविरुद्ध सोमवारी (6 नोव्हेंबर) खेळायचा आहे. (Mohan de Silva steps down as SLC secretary)
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडने उतरवली पाकिस्तानच्या ‘पेस बॅटरी’ची पॉवर! शाहिन-रौफच्या नावे लाजिरवाणे विक्रम
अफगाणिस्तानचे मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉटचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ‘पुढे कोणता संघ आहे याचा…’